COVID-19 च्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना व्हायरससारख्या महाभयाण विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून सोडले असून देशातही याचे हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी चर्चा करत आहे. या सर्वांवर मनसेप्रमुख राज ठाकरे कधी बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर अखेर आज सकाळी 11 वाजता राज ठाकरे कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. कोरोना या संसर्गाविषयी व त्या संदर्भात चालू असलेल्या घटनांसंदर्भात महाराष्ट्रातील व देशातील जनतेला उद्देशून पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसे राज्य सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.
या पत्रकार परिषदेचे प्रक्षेपण सकाळी 12 च्या सुमारास सर्व वृत्तवाहिन्या आणि सोशल माध्यमांवर दाखवण्यात येईल. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे नेमकं काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Coronavirus: मुंबई, पुणे, सांगली, नागपूर, अहमदनगर यांसह राज्यातील इतर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या किती घ्या जाणून
दरम्यान, देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांचा विचार करता ती आकडेवारीही मोठी आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या संख्या 2547 इतकी आहे. त्यापैकी 162 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने आणि त्यांना सध्या आराम वाटत असल्याने घरी सोडण्यात आले आहे. देशभरात आतापर्यंत कोरना लागन झालेल्या 62 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 2322 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) आणि कुटुंब कल्याण विभाग (Family Welfare) अशा दोघांनी ही माहिती संयुक्तरित्या दिली.