MLC Election 2022: पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषद नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्याकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रतिक्रिया
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सहाजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांकडूनही त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) भाजपने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सहाजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांकडूनही त्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेत्यांच्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आलेल्या प्रतिक्रिया पाहता तो एक डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असावा असाही सुरु आता राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे.
पंकजा मुंडे यांच्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न केले- चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षात आम्ही सगळे कार्यकर्ते कोरी पाकीटे असतो. त्यावर जो पत्ता लिहिला जातो तिथे आम्ही जातो. त्यामुळे पदांबाबत आम्ही कधीच विचार करत नाही. पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबाबत मी स्वत:, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सगळ्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, पंकजाताई या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने काही वेगळा विचार केला असेल. भविष्यात त्यांना आणखी मोठी संधी देण्याचा नेतृत्वाचा विचार असावा, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, MLC Election 2022: पंकजा मुंडे यांचा पत्ता कट, भाजपने विधानरिषद नाकारण्याची काय कारणे असू शकतात?)
पंकजा मुंडे यांना मोठी संधी मिळेल- अशिष शेलार
पंकजा मंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. राष्ट्रीय मंत्री आहेत. पंकजाताई आणि मुंडे परीवाराचे स्थान आमच्या पक्षात आणि जनतेत खूप मोठे आणि वरचे आहे. त्यामुळे ज्या बातम्या आज दिल्या जात आहेत. त्याही पेक्षा त्यांना मिळणारी संधी ही सध्या चालवल्या जाणाऱ्या बातम्यांपेक्षाही अधिक मोठी असेल हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, अशी प्रतिक्रीया अॅड. आशिष शेलारयांनी व्यक्त केली आहे.
पार्श्वभूमी
पंकजा मुंडे यांना विधान परिषद 2019 मध्ये त्यांचेच बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्या काहीशा नाराज झाल्या. त्याहीपेक्षा हा पराभव त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी अधिक लागला. त्यामुळे त्यानंतर झालेल्या विधानपरिषदेच्या रिक्त जागांमध्ये पंकजा मुंडे यांना पक्षाने संधी देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. राज्याचे नेतृत्व हाती असलेल्या आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांना हे शक्य होते. मात्र तसे घडले नाही. केंद्रीय नेतृत्वाकडे बोट दाखवत हा निर्णय आपला नसल्याचे तेव्हा महाराष्ट्र भाजप नेत्यांनी सांगितले. त्या वेळी पक्षाने 21 मे 2020 रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपिचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना संधी दिली. दुसऱ्या बाजूला विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या अनेकांचा पत्ता कापला. पुढे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)