Mumbai Crime: आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या घरी चोरी, 25 लाख रुपयांवर डल्ला; जवळच्याच माणसावर संशय
आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या घरी चोरी झाली आहे. शिंदे हे नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे (Loha Kandhar Constituency) आमदार आहेत. चोरट्यांनी आमदार शिंदे यांच्या घरातून तब्बल 25 लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबई (Mumbai) येथील घरी हा प्रकार घडला.
आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांच्या घरी चोरी झाली आहे. शिंदे हे नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे (Loha Kandhar Constituency) आमदार आहेत. चोरट्यांनी आमदार शिंदे यांच्या घरातून तब्बल 25 लाख रुपयांची रक्कम लांबवली आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या मुंबई (Mumbai) येथील घरी हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे आरोपींनी शिंदे यांच्याकडे तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही समजते. या प्रकरणी एन एम जोशी पोलीस स्टेशन (N M Joshi Police Station) दप्तरी गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपिंचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, शिंदे यांच्या चालकावर (Driver) पोलिसांना संशय असल्याचे समजते. त्यांच्या चालकानेच आपल्या मित्रा करवी चोरीचा कट रचूनच तो अमलात आणला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे मुंबई येथील लोढा बॅलोसिमो को- ऑफ. सोसायटीत घर आहे. शिंदे यांच्याकडे चक्रधर पंडित मोरे हा चालक म्हणून कामाला आहे. त्यानेच आपला मित्र अभिजीत कदम याच्यासह चोरी केली असावी असा संशय आहे. चोरीची घटना एक एप्रिल ते 28 एप्रिल या काळात घडली. आमदार शिंदे यांच्या घरातून तब्बल 25 लाख रुपये लांबविण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला आरोपींनी आमदार शिंदे यांना कथीतरित्या 30 लाख रुपयांची खंडणीही मागितली. आरोपीने आमदारांना धमकी देताना म्हटले की, येत्या 1 जून पर्यंत पैसे द्या. अन्यथा रायगडला जाऊन स्वत:ला इजा करुन घेईल. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर तुमची बदनामीही करेन, अशी धमकी आरोपीने दिल्याचे समजते.
दरम्यान, घडल्या प्रकारानंतर आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाने एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये चालक चक्रधर पंडित मोरे आणि त्याचा मित्र अभिजित कदम यांच्या विरोधात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र, आमदाराच्या घरी चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
श्यामसुंदर शिंदे हे नांदेडमधील लोहा-कंधार मतदारसंघाचे (Loha Kandhar Constituency) आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत लोहा मतदारसंघात शेकापतर्फे निवडून आलेले शिंदे हे या पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. शेकापतर्फे निवडून आल्यावर सुरुवातीला त्यांनी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिलं होतं. नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीसोबत राहिल्यानंतर त्यांनी आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपशी घरोबा केला.
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 01:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

