MLA Sada Sarvankar: आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त पिस्तूलाची होणार फॉरेन्सिक चाचणी; अडचणी वाढण्याची शक्यता
हे पिस्तूल पुढील तपासणीसाठी आता फॉरेन्सिक (Forensic Test) विभागाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदा सरवणकर यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील शिवसेना आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे पिस्तूल मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जप्त केले आहे. हे पिस्तूल पुढील तपासणीसाठी आता फॉरेन्सिक (Forensic Test) विभागाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदा सरवणकर यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. या पिस्तूलातूनच त्यांनी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी झालेल्या कथीत राड्यावेळी गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी सदा सरवणकर यांच्या पिस्तूलासोबतच घटनास्थळावरुन गोळीही जप्त केली आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदे गट समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. या राड्यावेळी दोन्ही गट एकमेकांना भिडले. या वेळी आमदार सदा सरवणकर यांनी थेट पिस्तूलच हातात घेतले. त्यांनी आपल्या जवळील पिस्तूलातून जमीनीवर फायर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, कथीत राड्याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात तक्रारीही दिल्या आहेत. मुंबई पोलीस एकूण प्रकरणाचाच तपास करत आहेत. (हेही वाचा, Shiv Sena Dasara Melava 2022: शिवाजी पार्क मैदान मिळण्याबाबत साशंकता, दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून इतर जागांसाठीही चाचपणी)
ट्विट
गणेश विसर्जनादरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गट समर्थकांमध्ये 11 सप्टेंबर रोजी जोरदार राडा झाला होता. गणेश विसर्जन मिरवणूक प्रभादेवी येथे आल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून सबूरीने घेण्यात आले. दरम्यान, सदा सरवणकर समर्थकांकडूनक शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रकार झाला. त्यातच आमदार सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.