MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वेळापत्रकासाठी शेवटची संधी?

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्यापुढे सुरु असलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकाचे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर आज सर्वोच्च न्यायालयात मिळणार आहे.

Rahul Narwekar | (Photo credit: archived, edited, representative image)

MLA Disqualification Case: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्यापुढे सुरु असलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकाचे काय झाले? या प्रश्नाचे उत्तर आज सर्वोच्च न्यायालयात मिळणार आहे. या प्रकरणावर आज (30 ऑक्टोबर) सुनावणी पार पडत आहे. दसऱ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज आज सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पाठिमागील सुनावणीत सरन्यायाधीशांनी दिलेल्यानिर्देशानुसार या प्रकरणात वेळापत्रक सादर करण्याची विधानसभा अध्यक्षांना (Rahul Narwekar) आज शेवटची संधी आहे. त्यांनी जर वास्तवदर्शी वेळापत्रक सादर नाही केले तर आम्हालाच काही आदेश द्यावे लागती, असे कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आमदार अपात्रता प्रकरणावरुन या आधीच्या सुनाणीत विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीबद्दल सुप्रिम कोर्टाने जोरदार ताशेरे ओढले होते. विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल यांनी त्या सुनावणीवेळी अध्यक्षांचा लंगडा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने संतप्त होत, अध्यक्षांना कोणीतरी समजावून सांगा कर्टाचे निर्देश काय असतात. तसेच, प्रसारमाध्यमांना मुलाखती देत बसण्यापेक्षा अध्यक्षांनी कोर्टाला निश्चित वेळापत्रक सादर करा, अशा स्पष्ट शब्दात सुनावले. कोर्टाने व्यक्त केलेल्या तीव्र नापसंती आणि नाराजीनंतर सॉलिसिटर जनरल यांनी आम्हाला काहीसा अवधी द्या, दसऱ्याच्या सुट्टीत आम्ही विधानसभा अध्यक्षांसोबत बसून नवे वेळापत्रक ठरवतो, असे कोर्टाला सांगितले.

दरम्यान, कोर्टाने इतके ताशेरे ओढल्यानंतर आज तरी विधानसभा अध्यक्ष योग्य पद्धतीने वेळापत्रक सादर करणार का? याबाबत उत्सुकता आहे. विधानसभा अद्यक्षांच्या वतीने आज जर कोर्टात वेळापत्रक सादर झाले नाही किंवा सादर केलेले वेळापत्रक कोर्टाला पसंत पडले नाही, तर मात्र, कोर्ट काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता आहे. कायद्याचे अभ्यास सांगतात की, विधानसभा अध्यक्षांना आजची शेवटची संधी असेल. अन्यथा कोर्ट हे प्रकरण स्वत:कडे घेऊ शकते किंवा स्वत: कोर्टच अध्यक्षांना विहीत कालावधीत निर्णय घेण्याचे आदेश देऊ शकते. कोर्ट अध्यक्षांना वेळापत्रकही देऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच असा अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षासबतच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अशाच प्रकारचा गुंता पाहायला मिळतो आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षांच्या याचिकेवर एकत्रितच निर्णय येण्याची शक्यता आहे.