Bacchu Kadu Coronavirus Positive: बच्चु कडु यांंना कोरोनाची लागण होताच ढसाढसा रडायला लागला हा लहानगा (Watch Video)

महाविकास आघाडी मधील राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कोरोनाची लागण झाली आहे, या ट्विटनंंतर कडु यांंच्या सर्व स्तरातील समर्थकांंकडुन त्यांंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. आजही अशाच एका समर्थकाचा व्हिडिओ समोर येत आहे. स्वतः बच्चु कडु यांंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Bacchu Kadu Supporter (Photo Credits: Twitter)

Bacchu Kadu Coronavirus Positive: महाविकास आघाडी मधील राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कोरोनाची लागण झाली आहे, काल त्यांंनी स्वतः याबाबत माहिती देत ट्विट केलं होतं. या ट्विटनंंतर कडु यांंच्या सर्व स्तरातील समर्थकांंकडुन त्यांंच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. आजही अशाच एका समर्थकाचा व्हिडिओ समोर येत आहे. स्वतः बच्चु कडु यांंनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका लहानग्या समर्थकाचा हा व्हिडिओ असुन यात तो बच्चु कडु यांंचे कोरोना रिपोर्टस निगेटिव्ह यावेत त्यांंना काहीही होउ नये त्यांंनी लवकरात लवकर बरे व्हावे अशा प्रार्थना देवाकडे करताना दिसतोय, यावेळी या लहानग्याने निरागस पणे जोडलेले हात आणि डोळ्यातुन वाहणारे अश्रु पाहता बच्चु कडु यांंच्या कामाने प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला किती भारावुन टाकलंय याचं स्पष्ट दर्शन होत आहे.

Sudhir Mungantiwar Tested Coronavirus Positive: महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोना विषाणूची लागण

बच्चू कडू यांनी या मुलाचा व्हिडिओ शेअर करताना, "बेटा मला काहीच नाही होणार, औषधी सोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर.." असे म्हंंटले आहे.

बच्चु कडु ट्विट

दरम्यान, यापुर्वी महाविकास आघाडीतील नेते अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. केंद्रात सुद्धा नितिन गडकरी यांंच्यासहित अनेक मंंत्री कोरोनाबाधित आहेत. कोरोनाचा हाहाकार सुरु झाल्यापासुन राजकारणी, कलाकार, पोलिस सर्व स्तरातील व्यक्ती या विषाणुच्या विळख्यात अडकले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement