MLA Anil Babar Passed Away: आमदार अनिल बाबर यांचे निधन

ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागन झाली होती. सांगली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

Anil Babar | (Photo Credit - Facebook)

Anil Babar News: खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील (Khanapur Atpadi Assembly Constituency शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन (Anil Babar Passes Away) झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागन झाली होती. सांगली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तळागाळातून आलेले व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. खानापूर आटपाडी मतदारंघात त्यांना टेंभू योजनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जात असे. सर्वांना सोबत घेऊन काम करणारा आमदार अशीच त्यांची ओळख होती.

'टेंभू योजनेचे जनक'

अनिल बाबर यांना खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या टेंभू योजनेचे जनक म्हणून त्यांना ओळखले जात असे. राज्यातील मंत्री शंभुराजे देसाई यांच्या कुटुंबातील एका विवाह प्रसंगी दोन दिवसांपूर्वीच आमदार अनिल बाबर उपस्थित होते. त्यानंतर त्यांना प्रकृतीचा त्रास उद्भवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. (हेही वाचा, Anil Babar: आमदार अनिल बाबर यांनी मंंत्रिपदाचा विषय नशिबावर सोडला, खानापूर-आटपाडीतील कार्यकर्त्यांना मात्र अपेक्षा कायम)

Anil Babar | (Photo Credit - Facebook)

काँग्रेस-NCP-शिवसेना

अनिल बाबर हे अलिकडील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेले. खरे तर त्यांची सुरुवात काँग्रेसमधून झाली. सुरुवातीला ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अपक्ष म्हणूनही काही काळ आमदार राहिले. दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर प्रदीर्घ काळ ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावरच आमदार राहिले. पुढे 2014 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. (हेही वाचा, Tembhu Irrigation Scheme: टेंभू पाणी योजना; अनिल बाबर, सुमन पाटील, Sanjaykaka Patil यांच्यात श्रेयवादाची लढाई)

Anil Babar | (Photo Credit - Facebook)

अजातशत्रू अनिल बाबर

शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपदाची अभिलाषा होती. मात्र, मंत्रीपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. पुढे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातत बंड केले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची अशा दोन शिवसेना निर्माण झाल्या. अशा स्थितीत ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहिले. सत्तेसोबत राहिल्याने मतदारसंघातील विकासनिधीचे गणीत जमवता येईल, असे त्यांचे गणित असावे. त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र नेहमीच त्यांनी मंत्रि व्हावेसे वाटत होते. स्वत: बाबर यांनी तशी भावना जाहीरपणे केव्हाही बोलून दाखवली नव्हती. प्रदीर्घ काळ दोन तालुक्यांच्या मतदारसंघात राजकारण करत राहिले असले तरीही अनिल बाबर हे नेहमीच वादातीत व्यक्तीमत्व राहिले. खानापूर आठपाडी मतदारसंघातील अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तीमत्व मानले जात असे. अनिल बाबर यांच्या पश्चात अमोल आणि सूहास अशी दोन्ही मुले राजकारणात सक्रीय आहेत.