Missing Minors in Mumbai: मुंबईत दररोज 10 अल्पवयीन मुले बेपत्ता होतात, केवळ 9 महिन्यांत 1,500 हून अधिक मुले मिसिंग- Police Report
बेपत्ता मुलांबाबत भाष्य करताना मुंबई पोलिसांच्या बेपत्ता ब्युरोच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शर्मिला सहस्त्रबुद्धे सांगतात की, घरातून पळून जाणे हा समस्यांवर उपाय नाही. तोडगा काढण्यासाठी संवाद, पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.
Missing Minors in Mumbai: साधारण 20 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई (Mumbai) शहरात, दररोज 10 अल्पवयीन मुले बेपत्ता होत आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत 1558 अल्पवयीन मुले बेपत्ता झाले आहेत, याचा अर्थ दर महिन्याला 173 मुले बेपत्ता होत आहेत. मुंबई पोलिसांचा असा दावा आहे की, या मुलांचा शोध दर 90% आणि 95% दरम्यान आहे आणि शोध न लागणाऱ्या अल्पवयीन मुलांचा दर 2% आणि 5% च्या दरम्यान आहे. अंधेरी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल असलेले राजेश पांडे बेपत्ता मुलांचा शोध घेण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जातात आणि ते 2011 पासून या क्षेत्रात सक्रिय आहेत.
त्यांनी हजारो बेपत्ता मुलांची पुन्हा त्यांच्या पालकांशी भेट घडवून आणली आहे. नुकतेच दोन महिन्यांपूर्वी त्यांनी एका 16 वर्षांच्या मुलीचा शोध घेतला होता. राजेश पांडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एका बेपत्ता झालेल्या मुलाला आंध्र प्रदेशातून मुंबईत यशस्वीरित्या परत आणले. या मुलाची 2018 मध्ये विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. या सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलाला शोधण्यात राजेश पांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विक्रोळी परिसरातून बेपत्ता झालेला मुलगा त्यावेळी अवघ्या आठ वर्षांचा होता. तो 14 वर्षांचा झाल्यानंतर आंध्र प्रदेशात सापडला आणि त्याला सुखरूप मुंबईत परत आणले गेले.
बेपत्ता मुलांबाबत भाष्य करताना मुंबई पोलिसांच्या बेपत्ता ब्युरोच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शर्मिला सहस्त्रबुद्धे सांगतात की, घरातून पळून जाणे हा समस्यांवर उपाय नाही. तोडगा काढण्यासाठी संवाद, पाठिंबा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. (हेही वाचा: Salman Khan Threat Updates: अभिनेता सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी; मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकीचा मेसेज)
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निशिकांत विभूते यांच्या मते, 18 वर्षाखालील अल्पवयीन मुले घरातून पळून जाण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत-
कौटुंबिक तणाव
शिक्षण किंवा करिअरशी संबंधित समस्या
मानसिक आरोग्य समस्या
गैरवर्तन किंवा घरगुती हिंसा
अफेअर किंवा नातेसंबंधातील समस्या
आर्थिक समस्या किंवा गरिबी
सामाजिक किंवा सांस्कृतिक दबाव
दरम्यान, सप्टेंबर 2024 पर्यंत 480 अल्पवयीन मुले बेपत्ता झाली; त्यातील 443 सापडले, परंतु 37 मुले अद्याप सापडलेली नाहीत. सप्टेंबर 2024 पर्यंत 1078 मुली बेपत्ता झाल्या; त्यातील 967 शोधल्या गेल्या, परंतु 111 अद्याप सापडलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे, सप्टेंबर 2024 पर्यंत, 18 वर्षांवरील 3,252 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती, त्यापैकी 2,676 पोलिसांना सापडल्या आहेत, तर 616 महिला बेपत्ता आहेत. याव्यतिरिक्त, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे 3,300 पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे, त्यापैकी 2,552 पोलिसांना सापडले आहेत, परंतु 775 पुरुष अद्याप बेपत्ता आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)