पुणे: कपडे बदलताना महिलेचा अश्लिल व्हिडिओ; नामांकित हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयला अटक

पत्नीने दिलेली माहिती समजताच पतीने रुग्णालय प्रशासनाला खडसाऊन जाब विचारला. तसेच, घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरुन रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, पोलिसांनी कारवाई करत लकेश लहू उत्तेकर या वॉर्डबॉयला अटक केली

Obscene Video

आजारामुळे होणाऱ्या वेदनेपासून सुटका मिळविण्यासाठी मोठ्या विश्वासाने रुग्णालयात गेलेल्या महिलेसोबत धक्कादायक प्रकार पुणे (Pune City) शहरात घडला. ही महिला पोटदुखीने त्रस्त होती. त्यामुळे उपचार करुन घेण्यासाठी ती पुणे शहरातील बंडगार्डन रस्त्यावरील (Bund Garden Road) नामांकीत रुग्णालयात रात्री नऊ वाजणेच्या सुमारास दाखल झाली. या महिला रुग्णाला (Woman Patient) उपचारादरम्यान वैद्यकीय तपासणी करण्याचे कारण सांगत कपडे बदलण्यास सांगण्यात आले. कपडे बदलण्यासाठी ही महिला रुग्णालयातील खोलीत गेली असता तिचा अश्लिल व्हिडिओ (Obscene Video) बनविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी लकेश लहू उत्तेकर (वय २५, सध्या रा. भैरवनगर, धानोरी, मूळ रा. रत्नागिरी) नावाच्या एका वॉर्ड बॉयला ताब्यात घेण्यात आले आहे. आपल्या पतीच्या मदतीने महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुण्यातील एका नामांकीत रुग्णालयात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली असून, आता रुग्णालयातील रुग्णांचीही सामाजिक सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

प्राप्त माहिती अशी की, पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे ती या रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला उपचारापूर्वी वैद्यकीय तपासणी करावी लागेल असे सांगितले. तसेच, ही तपासणी करण्यासाठी महिलेला पोशाख बदलावा लागेल असे सांगण्यात आले. त्यासाठी तिला रुग्णालयातीलच एका खोलीत पाठवण्यात आले. खोली पाहून महिलेला संशय आला. ती खोली कपडे बदलण्याची असावी असा कुठल्याही अंगाने त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे कपडे बदलून ही महिला वैद्यकीय तपासणी करण्यास गेली तरीही तिच्या मनात शंका कायम होती.

दरम्यान, वैद्यकीय तपासणी करुन संबंधीत महिला परत आली. तिने पुन्हा कपडे बदलून मूळ कपडे अंगावर चढवले. दरम्यान, तिला खोलीत एक मोबाईल संच आढळून आला. महिलेने त्या मोबाईलची पाहणी केली असता त्यात ती कपडे बदलत असतानाचे चित्रकरण झाल्याचे जाणवले. या घटनेमुळे घाबरलेल्या महिलेने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या पतीला दिली. (हेही वाचा, हजारो स्त्रियांचे स्थन जाळले; पुरुषांपासून बचाव करण्यासाठी इंग्लंड, अफ्रिकेत मुलींवर अघोरी उपाय, स्थनांच्या कर्करोगाचा धोका)

पत्नीने दिलेली माहिती समजताच पतीने रुग्णालय प्रशासनाला खडसाऊन जाब विचारला. तसेच, घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरुन रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, पोलिसांनी कारवाई करत लकेश लहू उत्तेकर या वॉर्डबॉयला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल संचही जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील नामांकीत रुग्णालयात रात्री नऊ वाजणेच्या सुमारास हा प्रकार घडला. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी कपडे बदलण्यासही उत्तेकर यानेच सांगितल्याचे समजते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now