Mumbai Crime: जुहू परिसरात महिलेसोबत गैरवर्तन, पोलिसांचा तपास सुरु (Watch Video)
महिलेने सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला.
Mumbai Crime: मुंबईतील जुहू येथील परिसरात एका महिलेने असा दावा केला आहे की, काही अज्ञात तरुण महिलेचा पाठलाग करत तिचा छळ करत आहे. महिलेने सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला. महिलेने शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहले आहे की, रस्त्याच्या मधोमध अज्ञात तरुण त्यांची पॅन्ट काढतात आणि तिला मोठ्याने हाक मारून तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एका महिलेचा पाठलाग करून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. (हेही वाचा- पुणे येथील रोड रेज प्रकरणी एकास अटक; महिलेला केली होती बेदम मारहण)
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने या घटनेनंतर मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. छळ करणाऱ्यांना शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. @Viyaadoshi या ट्वीटर वापरकर्त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, जुहूच्या जानकी कुटीर भागात एक पुरुष शॉर्टस आणि बनियान घालून फुटपाथवरून धावताना दिसत आहे. महिला मागे धावून व्हिडिओ बनवत होती. महिलेने पुढे दावा केला आहे की, हे अज्ञात पुरुष रस्त्याच्या मधोमध उभे राहून मोठमोठ्याने हाक मारून त्रास देतात.
या पोस्टला मुंबई पोलिसांनी दखल घेतली आणि तिच्याशी संपर्क करत पोस्टला उत्तर दिले. महिलेने सांगितले की, तिने निर्भया पथकाला कॉल करण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या फोन कॉलला उत्तर मिळाले नाही. मुंबईतील जुहू सारख्या पॉश परिसरात या अश्या घटना घडल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी विनंती महिलेने केली आहे.