Mira-Bhayandar: माजी आमदार Narendra Mehta, भाजप नगरसेवक यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या सविस्तर

महापौर-ज्योत्स्ना हसनाळे (भाजप) यांनी महापालिका आयुक्त- दिलीप ढोले यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणामध्ये 3.93 कोटींचा भूमिपूजन समारंभ आणि काशिमीरा तलावाचे दुरुस्ती व सुशोभीकरणाचे कामाबाबत आक्षेप घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

Former BJP MLA Narendra Mehta | (Photo Credits: Facebook)

एमबीएमसी (MBMC) अभियंता प्रफुल वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, काशिमीरा पोलिसांनी माजी आमदार- नरेंद्र मेहता (Narendra Mehta) आणि दोन भाजप नगरसेवक- सचिन म्हात्रे, सुजाता पारधी यांच्यासह 11 जणांवर बेकायदेशीर बॅनर लावून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट, 1995 चे कलम 3 आणि आयपीसीच्या कलम 188 अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महापौर-ज्योत्स्ना हसनाळे (भाजप) यांनी महापालिका आयुक्त- दिलीप ढोले यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणामध्ये 3.93 कोटींचा भूमिपूजन समारंभ आणि काशिमीरा तलावाचे दुरुस्ती व सुशोभीकरणाचे कामाबाबत आक्षेप घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. महापौरांनी असा युक्तिवाद केला की शहरातील नागरी सुविधांच्या उद्घाटन समारंभाच्या संदर्भातील हा सोहळा राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि एमबीएमसीच्या स्वतःच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे.

मात्र महापौरांनी असेही सांगितले की, त्यांनी केवळ नागरी प्रमुखांसोबत प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याचा पोलिसांच्या तक्रारीशी काहीही संबंध नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांनी घटनास्थळाजवळील रस्त्यावरील दिव्याच्या खांबावर एक फ्लेक्स बॅनर देखील पिन केला होता, ज्याने नागरी अधिकाऱ्यांना सार्वजनिक मालमत्तेची विटंबना केल्याबद्दल आणि सार्वजनिक अधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याबद्दल आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. (हेही वाचा: MVA On BJP: तुमचेच 25 आमदार आमच्या संपर्कात, त्यांना सुरक्षीत ठेवा; महाविकासआघाडीतील मंत्र्याचे भाजपला प्रत्युत्तर)

दरम्यान, याआधी माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये मेहता यांच्या स्टिंग ऑपरेशनचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरेंद्र मेहता यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, ‘पक्षाची प्रतिमा डागाळू नये म्हणून आपण राजकारणामधून निवृत्ती घेत आहोत.’