Gulabrao Patil: राज्यमंत्री महोदय बिग बॉसमध्ये जाण्यास इच्छुक? म्हणाले,संधी मिळाल्यास बिग बॉस मध्येही जावू

बिग बॉसमध्ये बोलावले तर ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने मी जाई, असं राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले आहे.

Gulabrao Patil (Photo Credit: Twitter)

गेल्या महिन्याभऱ्या पूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Government) मंत्री मंडळाचा विस्तार झाला. या मंत्री मंडळातील विविध मंत्री महोदय हल्ली त्यांच्या कामासाठी नाही तर विविध वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पुन्हा एकदा त्यांच्या अजब वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. गुलाबराव पाटलांनी खुद्द बहूचर्चित रिअलिटी शो बीग बॉसमध्ये (Bigg Boss) जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरी बीग बॉस हिंदी (Big Boss Hindi) हा रिअलिटी शो (Reality Show) 1 ऑक्टोबर तर बीग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा 2 ऑक्टोबर (October) पासून प्रदर्शित होणार आहे. या रिअलिटी शो मध्ये अभिनेते (Actor), गायक (Singer), डान्सर अशी विविध क्षेत्रातली लोक हजेरी लावतात पण खुद्द राज्यमंत्री पदावर कार्यान्वित असणाऱ्या कुठल्या मंत्र्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली नाही तरी गुलाबराव पाटलांनी केलेल्या या वक्तव्याची मोठी चर्चा होत आहे.

 

गुलाबराव पाटलाला (Gulabrao Patil) बिग बॉसमध्ये (Bigg Boss) जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण मला होतेय, असे सांगत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना सांगितल्या. विद्यार्थी (Student) जीवनात अनेक नाटक (Play), गाणं (Singing), सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याचं गुलाबरावांनी सांगितलं. आताही मला या सगळ्यांची आवड आहे. आता देखील बिग बॉसमध्ये (Bigg Boss) बोलावले तर ही माझ्यासाठी सोन्यासारखी संधी आहे, मिळाली तर निश्चितपणाने मी जाई, असं राज्यमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्पष्ट केले आहे. (हे ही वाचा:-)

 

राज्य पाणी पुरवठा मंत्री आज जळगावत (Jalgaon आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकाराशी संवाद साधत असताना हे वक्तव्य केलं आहे. तरी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे कायमचं त्यांच्या विविध वक्तव्यासाठी चर्चेत असतात. आता बीग बॉस (Bigg Boss) बाबतच्या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.