Bachchu Kadu Appeal to PM Modi: आम्ही टाळी, थाळी वाजतवतो आता आमच्या मागण्या पूर्ण करा; मंत्री बच्चू कडू यांचे पंतप्रधान मोदी यांना अवाहन

हे आंदोलन उद्या (गुरुवार, 20 मे 2021) सायंकाळी 6.00 वाजता होणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Bachchu Kadu | (Photo Credits: Twitter)

केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणावरुन (Import-Export Policy) कृषीराज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी याबाबत ट्विटरवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, 'मोदीजी तुमच्या मते टाळी व थाळीने कोरोना जाणार होता. आता आम्ही शेतकरी टाळी व थाळी वाजवतो आमच्या मागण्या पुर्ण करा. एकीकडे कोरोनाने जिव चालला आहे व या जुलमी धोरणाने शेतकर्यांचा जिव घेऊ नका'. दरम्यान केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात बच्चू कडू यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचेही अवाहन केले आहे. हे आंदोलन उद्या (गुरुवार, 20 मे 2021) सायंकाळी 6.00 वाजता होणार असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

तूर, मूग आणि उडीद याचे कारण नसताना आयात करणे. आयातिचे निर्बंध खुले करणे. त्यामुळे विदेशातून भारतात तूर, मूग, उडीद आयात केली जाईल. त्यामुळे भारतातील तूर, मूग, उडीदांचे दर कोसळणार आहेत. यंदा 38 लाख टन तुर उत्पादन होणार आहे. आगोदरच भारताकडे 7 लाख टन तुरीचा साठा आहे. अशी एकूण 45 लाख टन तूर भारतात उपलब्ध आहे. भारताला आवश्यकता आहे 43 लाख टन तुरीची आवश्कता आहे. त्यामुळे जवळपास दोन लाख टन तूर भारतात शिल्लख आहे. असे असताना केंद्रातील मोदी सरकार हे 8 लाख टन तूर आयात करते आहे. ही वाढव तूर कशासाठी आयात केली जात आहे. याचे कारण केंद्र सरकार देत नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करावेत- बच्चू कडू)

एका बाजूला मेक इन इंडीया, मेड इन इंडिया म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला देशातील माल बाहेर निर्यात होऊ द्यायचा नाही. त्याउलट विदेशातील माल भारतात आयात करायचा. हे यांचे धोरण. शेतकऱ्यांना हमी भाव जाहीर करताना त्यात खतांचे वाढलेले दर धरलेच नाहीत. सरकारला शेतकऱ्यांच्या शेतीमालावरचा नफा वाढवने सरकारला जमलेच नाही. परंतू, त्याऐवजी उत्पादनावरचा खर्च वाढवण्याचे काम मात्र केंद्र सरकारने केले. त्यामुळे त्याच्या निशेधार्थ मोदीजींचाच मूलतंत्र वापरत भाववाडीविरोधात टाळी आणि थाळी वाजवून केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचा निशेध करावा, असे अवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.