MHADA Mill Worker Lottery Results 2020: गिरणी कामगारांच्या 3894 घरांची सोडत जाहीर; mhada.gov.in वर पाहा संपुर्ण निकाल, वाचा सविस्तर
मुंबई मधील बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल (Bombay Dyeing Textile Mill) , बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल (Bombay Dyeing Spring Mill) ,श्रीनिवास मिल (Shrinivas Mill) या जागी बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांसाठी 1 मार्च राजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यात आली या सोडतीचा निकाल पाहण्यासाठी mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
MHADA Mill Workers Housing Lottery Results Winners List: मुंबई मधील बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल (Bombay Dyeing Textile Mill), बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल (Bombay Dyeing Spring Mill), श्रीनिवास मिल (Shrinivas Mill) या जागी बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या 3 हजार 894 सदनिकांसाठी 1 मार्च राजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 17 हजार कामगारांपैकी लकी विजेत्यांना मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी 1 बीएचकेचे घर मिळणार आहे. काल यासाठी वांद्रे पूर्व येथील म्हाडाच्या कार्यालयात खास कार्यक्रम घेऊन ही सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीचा निकाल आता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. महाराष्ट्रात जातीच्या आधारावर होणार जनगणना? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
कुठे पाहता येणार निकाल?
गिरणी कामगारांच्या 3894 घरांच्या सोडतीचा निकाल पाहण्यासाठी mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
प्राप्त माहितीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमुळे रोजगार गमावलेल्या कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचे धोरण आहे, याच अंतर्गत काल ही सोडत जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी काल गिरणी कामगारांशी संवाद साधताना तुमच्या हक्काचे मुंबईतले हे घर विकून तुम्ही दुसरीकडे जाणार नाही असे वचन मागून घेतले. "तुमच्यासाठी आम्ही काही केले नाही तर आम्हीच नतद्रष्ट ठरू, तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी बलिदान दिलं आहे. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, या सोडतीत वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल येथे 720 उभारण्यात आलेल्या सदनिकाआहेत. तर, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल येथे 2630 आणि श्रीनिवास मिल येथे 544 घरे उभारण्यात आले आहेत. या घरांसाठी काल सोडत जाहीर करण्यात आली.