Pune Crime News: मध्यरात्री घरात घुसून एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या, पुण्यातील थरारक घटना
काल मध्यरात्री थरारक घटना घडली. ज्यामुळे खडक परिसरातील नागरिकांची झोप उडाली.
Pune Crime News: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे नागरिकांसमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा राहिला आहे दरम्यान काल मध्यरात्री थरारक घटना घडली. ज्यामुळे खडक परिसरातील नागरिकांची झोप उडाली. पुण्यातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरला आहे. मध्यरात्री अंदाजे २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिल साहू वय ३५ असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, या घटनेमुळे परिसराच भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अनिल साहू घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज चौकात राहत होता. ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास अनिल साहू झोपेत होता. त्यावेळी त्याचे कुटुंब देखील झोपेत होते. एक अज्ञाक व्यक्ती तिथे आला. घरात शिरुन त्या व्यक्तीनं अनिल साहूवर एकापोठापाठ तीन गोळ्या झाडल्या, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळावरून त्यांना रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती खडक पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरु केला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तसेच,पोलिसांकडून तपासणी सुरु झाली आहे. अज्ञाताने अनिल साहूचा खून का केला याचं उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. पोलीसांनी पथक नेमून आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 09:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

