Microsoft Acquires Land in Pune: मायक्रोसॉफ्टची पुण्यात मोठी गुंतवणूक! हिंजवडी येथे 16.4 एकर जमीन केली खरेदी

520 कोटी रुपयांना मायक्रोसॉफ्टने जमीन विकत घेतली आहे.

Microsoft (PC- Wikimedia Commons)

Microsoft Acquires Land in Pune:  रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सच्या म्हणण्यानुसार, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट(Microsoft)ने पुण्यात 16.4 एकर जमीन खरेदी केली (Microsoft Acquires Land in Pune)आहे. 520 कोटी रुपयांना मायक्रोसॉफ्टने जमीन विकत घेतली आहे. जागतिक टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66,414.5 चौरस मीटर (सुमारे 16.4 एकर) जमीन विकत घेतली आहे. स्क्वेअर यार्ड्सने पुनरावलोकन केलेल्या नोंदणी दस्तऐवजानुसार, मायक्रोसॉफ्टची भारतीय शाखा, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66,414.5 चौरस मीटर (सुमारे 16.4 एकर) प्राइम जमीन विकत घेतली आहे. (हेही वाचा:Maruti Suzuki Cars Became Cheaper: गुड न्यूज! मारुती सुझुकीच्या 'या' गाड्या आजपासून झाल्या स्वस्त; जाणून घ्या मॉडेल आणि किंमत )

ऑगस्ट 2024 मध्ये नोंदणीकृत व्यवहारात या मजिनीच्या खरेदीचा समावेश होता. इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपी कडील जमीन,” सल्लागाराने एका निवेदनात म्हटले आहे.या करारासाठी 31.18 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क आकारले गेले. हा व्यवहार झाला असला तरी, मायक्रोसॉफ्टने या जमीन खरेदीवर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. 2022 मध्ये, कंपनीने पिंपरी-चिंचवडमध्ये 328 कोटी रुपयांच्या मोबदल्यात 25 एकरचा भूखंड विकत घेतला होता. या वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने हैदराबादमध्ये 267 कोटी रुपयांची 48 एकर जमीन खरेदी केली होती.

दोन्ही जमीन खरेदी या मायक्रोसॉफ्टच्या भारतातील, विशेषत: डेटा सेंटर ऑपरेशन्समध्ये त्याची कामगिरी वाढवण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत. कंपनीच्या डेटा सेंटर्सच्या नेटवर्कमध्ये आधीच पुणे, मुंबई आणि चेन्नई येथील जागा समाविष्ट आहेत. ज्यामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये त्यांची उपस्थिती मजबूत करते.