MHT-CET निकाल जाहीर; मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीच्या सिद्धेश अग्रवालची टॉप कामगिरी, 99.98 टक्के मिळवून राज्यात प्रथम

यामध्ये मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीच्या सिद्धेश अग्रवालची टॉप कामगिरी, 99.98 टक्के मिळवून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा (MHT-CET)  निकाल नुकताच mahaonline.gov.in या वेबसाइटवरून जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई (Mumbai) च्या किमया शिकारखाने (Kimaya Shikarkhane)  व अमरावतीच्या सिद्धेश अग्रवाल (siddhesh Agarwal) याने घवघवीत यश संपादान केले आहे. या दोघांनी डिकीत 99.98 टक्के मिळवत टॉपरचा 'किताब प्राप्त केला आहे. यंदा महाराष्ट्रामध्ये 2 ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली होती. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून चार लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार सोमवारी हा निकाल मध्यरात्री पासूनच ऑनलाइन उपलब्ध होता. त्याचप्रमाणे आज दिवसभर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

MHT CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटी चा निकाल जाहीर; mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा रिझल्ट

निकाल पाहण्यासाठी या सोप्प्या स्टेप्स फॉलो करा

# mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर तुम्ही निकाल पाहू शकाल.

# download MAH CET 2019 result अशा टॅबवर क्लिक करा.

# तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल

# आवश्यक माहिती एन्टर केल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येऊ शकतो.

# MAH CET 2019 result ची मेरीट लिस्ट तुम्हांला डाऊनलोड करण्याची सोय आहे.

यंदा इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी विषयक अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी ही समयीक परिकसह घेण्यात आली होती. निकालानंतर काहीच दिवसात विद्ययार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार आहे.