MHT CET Result 2019: महाराष्ट्र बोर्ड सीईटी चा निकाल mhtcet2019.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर कसा पहाल?

बारावीच्या निकालानंतर आता इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्या निकालाचे वेध लागले आहेत.

CET Results 2019 (Photo Credits: Facebook)

Maharashtra Board CET Result 2019: बारावीच्या निकालानंतर आता इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेच्या निकालाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र बोर्ड सीईटीचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सीईटीचा निकाल mhtcet2019.mahaonline.gov.in वर हा निकाल ऑनलाईन पाहता येईल. पण निकाल नेमका कसा पाहावा यासाठी काही सोप्या स्टेप्स...

कुठे व कसा पहाल निकाल?

# mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर तुम्ही निकाल पाहू शकाल.

# download MAH CET 2019 result अशा टॅबवर क्लिक करा.

# तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल.

# आवश्यक माहिती एन्टर केल्यानंतर तुम्हांला निकाल पाहता येईल.

# तसंच MAH CET 2019 result ची मेरीट लिस्टही तुम्हांला डाऊनलोड करण्याची सोय आहे.

महाराष्ट्रामध्ये 2 मे ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्रात यंदा 3 लाख 96 हजार विद्यार्थी एमएचटी सीईटी या परीक्षेला बसले होते.