MHT CET Law 2020 Results: 3 वर्षीय एलएलबी कोर्स सीईटीचा आज निकाल जाहीर होण्याची शक्यता; mahacet.org वर पहा मार्क्स

तीन वर्षांच्या एलएलबी प्रोग्रामसाठी MAH CET Law Entrance Exam ही परीक्षा यंदा 2 आणि 3 नोव्हेंबर 2020 दिवशी घेण्यात आली होती.

Results 2020 | File Photo

महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्टरंस टेस्ट सेल(MAH CET)आज (25 नोव्हेंबर) दिवशी MAH CET LLB 3 Year 2020 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. दरम्यान परीक्षार्थींना हा निकाल mahacet.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तीन वर्षांच्या एलएलबी प्रोग्रामसाठी MAH CET Law Entrance Exam ही परीक्षा यंदा 2 आणि 3 नोव्हेंबर 2020 दिवशी घेण्यात आली होती. यंदा 5 वर्षीय LLB programmes च्या विद्यार्थ्यांची परीक्षा 11 ऑक्टोबरला झाली आहे. यंदा कोविड 19 संकटामुळे परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आले आहेत.

MHT CET LLB Result 2020 ऑनलाईन कसा बघाल?

दरम्यान जे विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेमध्ये क्वालिफाय होतात त्यांना counselling round साठी एलिजिबल केलं जातं. त्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी, सरकारी अनुदानित कॉलेजमध्ये LLB programmes साठी प्रवेश दिला जातो. MHT CET Result 2020 यंदा 28 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होण्याची शक्यता; जाणून घ्या यंदाच्या सीईटी निकाला विषयी काही महत्त्वाच्या अपडेट्स

महाराष्ट्रात PCM,PCB या ग्रुपसाठी झालेल्या परीक्षांच्या निकालाकडेही विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे. हा निकाल सीईटी सेलकडून 28 नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.