MHT CET 2020 Answer Key: स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्रने MHT CET 2020 साठी Answer Key जाहीर केली आहे. विभागाने ही अॅन्सर की mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. परीक्षेस बसलेले सर्व उमेदवार उद्या दुपारी एक वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उत्तरपत्रिका, रिस्पॉन्स शीट आणि प्रश्नपत्रिका तपासू शकतील. यासाठी उमेदवारांना त्यांचा अॅप्लीकेशन नंबर आणि पासवर्ड चा वापर करावा लागेल.
खालील स्टेप वापरून तुम्ही उत्तर तपासू शकता -
अॅन्सर की वर जाण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी Mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे. मुख्यपृष्ठावरील MHT CET 2020 अॅन्सर की या ऑपशनवर क्लिक करा. आता एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करावा. त्यानंतर हा अर्द सबमिट करावा. आता तुम्हाला स्क्रिनवर अॅन्सर की दिसेल. त्यानंतर उमेदवार आपल्या सेटनुसार अॅन्सर की तपासू शकतात. आवश्यक असल्यास तुम्ही आपली अॅन्सर की डाउनलोड आणि प्रिंट आउट करू शकता. (हेही वाचा - MHT CET Exam Date 2020 for Additional Session: 7 नोव्हेंबरला एमएचसीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा संधी; mhtcet2020.mahaonline.gov.in वरून डाऊनलोड करा हॉल तिकीट)
या Answer Key च्या माध्यमातून उमेदवार त्यांचा स्कोअर मोजू शकतात. त्याच बरोबर, एमएचटी सीईटी Answer Key मध्ये कोणतीही चूक आढळल्यास उमेदवार त्यांची तक्रार नोंदवू शकतील. यासाठी त्यांना 10 नोव्हेंबर (दुपारी 1 वाजता) ते 12 नोव्हेंबर (दुपारी 1) पर्यंत वेळ देण्यात येईल. अधिकृत संकेतस्थळावर उत्तराच्या तारखेसह एमएचटी सीईटी 2020 च्या निकालाची तारीख देखील जाहीर केली गेली आहे. अधिकृत नोटीसनुसार, निकाल 28 नोव्हेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट, cetcell.mahacet.org किंवा mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन चेक करावा.
दरम्यान, महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2020 ऑक्टोबरमध्ये अनेक टप्प्यात घेण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे काउंसिलिंग केले जाणार आहे. अहवालानुसार काउंसिलिंग तीन फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. या वेळी काउंसिलिंग प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे.