MHADA Pune Lottery 2021 Winner List: पुणे येथील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीतील विजेत्यांची लिस्ट lottery.mhada.gov.in येथे पाहा
महाराष्ट्र हाउसिंग अॅन्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) यांच्याकडून शुक्रवारी म्हणजेच 7 जानेवारी 2022 रोजी 4,222 घरांसाठीच्या लॉटरीतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
MHADA Pune Lottery 2021 Winner List: महाराष्ट्र हाउसिंग अॅन्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (MHADA) यांच्याकडून शुक्रवारी म्हणजेच 7 जानेवारी 2022 रोजी 4,222 घरांसाठीच्या लॉटरीतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. यामध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर यांचा समावेश होता. तर विजेत्यांची नावे घोषित करण्याची प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरु करण्यात आली होती. तर म्हाडाच्या घरांच्या विजेत्यांची लिस्ट lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
म्हाडाकडून घरांच्या लॉटरीचे थेट प्रक्षेपण त्यांच्या युट्युब चॅनलवर करण्यात आले होते. तर विजेत्यांची नावे ही वेबसाइटवर सुद्धा जाहीर करण्यात आल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे. एकूण 4,222 घरांसाठी, म्हाडाच्या विविध योजनांतर्गत 2,823 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत 1,399 सदनिकांची ही आठवी ऑनलाइन रिलीझ आहे.
4,222 फ्लॅटसाठी 80,848 अर्जदारांनी अर्ज केले होते. यापैकी, 65,180 व्यक्तींनी सोडतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी ठेव भरली. कोरोनामुळे जिल्हा परिषदेतील अवघ्या ५० जणांसह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.