MHADA Mumbai Lottery Results 2024: म्हाडा मुंबई लॉटरी मध्ये घर लागलं तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा गमवाल घर

आज संध्याकाळी सहाच्या सुमारास भाग्यवान विजेत्यांची यादी आणि वेटिंग लिस्ट वर असलेल्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

Representational Image | Pixabay

मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांसाठी (MHADA  Mumbai) आज निकाल जाहीर झाला आहे. 1 लाखापेक्षा अधिक अर्जदारांनी अवघ्या 2030 घरांसाठी अर्ज केल्यानंतर मुंबई मध्ये घरांचं स्वप्न पाहणार्‍यांचा आकदा किती मोठा आहे? याचा अंदाज आलाच असेल. दरम्यान मुंबई मध्ये घर घेण्यासाठी उत्सुक असलेल्यांना आज मंत्री अतुल सावे यांनी लवकरच अजून एक लॉटरी मुंबईच्या घरांसाठी जाहीर केली जाईल असं म्हटलं आहे. दरम्यान आज ज्या भाग्यवान विजेत्यांना म्हाडाचं घर लागणार आहे. त्यांना आता पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. काही चूकांमुळे घर गमावण्याची देखील वेळ येऊ शकते.

म्हाडाचं घर तुम्हाला लागल्यानंतर आता तुम्हांला ते हवे असल्यास 10 दिवसांमध्ये त्याचं स्वीकृतीपत्र द्यावं लागणार आहे. उमेदवाराला तात्पुरते देकारपत्र Online Login च्या माध्यमातून दिले जाईल. त्यानंतर विजेत्या उमेदवाराला घराची रक्कम दोन टप्प्यामध्ये भरावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात घराच्या एकूण किमतीच्या 25 टक्के रकमेचा भरणा करावा लागेल. तर उरलेली 75 टक्के रक्कम ही दुसऱ्या टप्प्यात भरावी लागेल. 25  टक्के रक्कम भरण्यासाठी 45 दिवसांचा अवधी असेल तर 75 % रक्कम भरण्यासाठी 60 दिवसांचा अवधी असतो.. दरम्यान अर्जदाराने घराची 10 टक्के रक्कम भरल्यानंतर बँक ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल.

सोडतीमध्ये अयशस्वी झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांना त्यांनी अदा केलेली संपूर्ण अनामत रक्कम (विनाव्याज) अर्ज शुल्क वगळून रक्कम परत दिली जाणार आहे.

कुठे पहाल म्हाडाचं घर लागलेल्या भाग्यवान विजेत्यांची यादी?

www.mhada.gov.in वर या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्याकडून यशस्वी (Winner List) आणि प्रतिक्षा यादीतील (Wait List) अर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.