MHADA Mumbai Lottery 2024 Winners List: म्हाडाकडून 2,030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; https://www.mhada.gov.in/en वर प्रसिद्ध झाली विजेत्यांची यादी, जाणून घ्या

या प्रकल्पात मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार 30 घरांसाठी 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

MHADA Mumbai Lottery 2024 Winners List: म्हाडाकडून 2,030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; https://www.mhada.gov.in/en वर प्रसिद्ध झाली विजेत्यांची यादी, जाणून घ्या
MHADA Lottery (Photo Credit : PTI)

MHADA Mumbai Lottery 2024 Winners List: म्हाडाच्या (MHADA) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या 2,030 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली. आजच्या या लॉटरीसाठी 1 लाख 13 हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. आजची ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली. आता म्हाडाद्वारे सोडत विजेत्यांची नावे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.

या घरांसाठी अर्ज केलेले उमदेवार https://www.mhada.gov.in/en अथवा https://housing.mhada.gov.in/ त्यांची नावे पाहू शकतात. म्हाडाच्या या लॉटरीमुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना घर मिळणार आहे. म्हाडाने मुंबईतील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. या प्रकल्पात मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार 30 घरांसाठी 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. म्हाडा लॉटरी 2024 मधील विजेत्याला पात्रता निकष पाळावे लागतील. ज्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. अर्जासाठी त्याला रहिवासी प्रमाणपत्र द्यावे लागेल, यावरून तो 15 वर्षांपासून सतत महाराष्ट्रात राहत असल्याचे सिद्ध होते. यासोबतच आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखलाही द्यावा लागणार आहे. (हेही वाचा: CIDCO Expands Housing Scheme: नवी मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर! खारघरमध्ये 190 अतिरिक्त सदनिका उपलब्ध, अर्जाची अंतिम मुदतही वाढली, जाणून घ्या सविस्तर)

दरम्यान, एकूण 2,030 युनिट्समध्ये मध्यम उत्पन्न गट (MIG) श्रेणीमध्ये सर्वाधिक घरे म्हणजेच जवळजवळ 768 अपार्टमेंट्स असतील. लॉटरीसाठी उपलब्ध असलेल्या घरांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त घरे ही कमी उत्पन्न गटासाठी (LIG) असून त्यांची संख्या 627 अपार्टमेंट इतकी आहे. आर्थिक दुर्बल विभाग (EWS) श्रेणीमध्ये 359 युनिट्स आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अपार्टमेंटची किमान संख्या 276 असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)


Share Us