MHADA Mumbai Board Lottery Results 2019: मुंबईतील म्हाडा घराच्या सोडत निकालात राशी कांबळे ठरल्या पहिल्या भाग्यवान विजेत्या, lottery.mhada.gov.in वर पाहा विजेत्यांची यादी

त्यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या असल्याची घोषणा म्हाडाकडून करण्यात आली आहे.

Mhada Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

MHADA Mumbai Board Lottery Results 2019: मुंबईसाठी (Mumbai) म्हाडाने (MHADA) 217 सदनिकांसाठी सोडत काढली होती. त्याचा निकाल आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार होता. तर निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सहकार नगर चेंबूर मधील अल्प उत्पन्न गटामधील अर्जदारांसाठी पाहिली लॉटरी काढण्यात आली. त्यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या असल्याची घोषणा म्हाडाकडून करण्यात आली आहे.

या सोडत निकालाचे थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in येथून दाखवण्यात आले. तसेच म्हाडा भवानाच्या बाहेरसुद्धा अर्जदारांना निकाल पाहण्यासाठी मंडपाची सोय करुन देण्यात आली आहे. यावेळी भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली होती. तर गिरणी कामगारांसाठी म्हाडाने खुशखबर दिली असून सेन्च्युकी, श्रीनिवार मिल कामगारांसाठी यावेळी 3800 घरांची लॉटरी ऑगस्टमध्ये काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.(MHADA Mumbai Board Lottery Results 2019: मुंबई मधील 217 घरांसाठी सोडत निकाल आज 10 वाजता जाहीर होणार, lottery.mhada.gov.in येथे पाहा विजेत्यांची यादी)

-कशी पहाल भाग्यवान विजेत्यांची यादी

>lottery.mhada.gov.in ओपन करा.

>या संकेतस्थळावर तुम्ही ज्या ठिकाणी लॉटरीच्या घराचा अर्ज भरला आहे त्यावर क्लिक करा.

>मेन्यु बार वर तुम्हांला Lottery Result वर क्लिक करा.

>त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.

>तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार भाग्यवान विजेत्यांची आणि प्रतीक्षेत असल्याची यादी पाहता येईल.

तर सोडत मधील भाग्यवान विजेते आणि प्रतीक्षा यादीमधील अर्जदारांची नावे संध्याकाळी सहा वाजता http://lottery.mhada.gov.in येथे जाहीर करण्यात येणार आहेत. यंदा म्हाडाकडून काढण्यात आलेल्या 217 घरांच्या सोडतमध्ये 170 घरे अल्प उत्पन्न गट आणि 47 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आली होती.