MHADA Lottery 2024: मुंबई मध्ये 2030 घरांसाठी 68000 अर्जदार; 19 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज
ज्याची किंमत सुमारे 6.82 कोटी आहे. दक्षिण मुंबई मधील हे घर 1500 स्क्वेअर फूट चं आहे. या घरातून सीफेस आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा भाग दिसतो.
महाराष्ट्र हाऊसिंग अॅन्ड एरिया डेव्हलपमेंट (Maharashtra Housing and Area Development Authority) कडून मुंबई (Mumbai) मधील घरांसाठी काढलेल्या लॉटरीला यंदा 68 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. यंदा 29 लाख ते 6.82 कोटी किंमतीची 2 हजार घरं आहेत. 29 ऑगस्टपर्यंत 30 हजार घरांसाठी अर्ज आले होते. मात्र नंतर घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या आणि दोन आठवड्यात अर्जांची संख्या दुप्पट झाली आहे. नक्की वाचा: MHADA Mumbai Lottery: म्हाडा मुंबई लॉटरी घरांच्या किंमतीमध्ये मोठी कपात, EWS, LIG, MIG आणि HIG श्रेणींसाठी नवीन दर जाहीर .
म्हाडा कडून 370 घरांच्या किंमती कमी केल्या होत्या. 29 ऑगस्टला घोषणा करत त्यांनी काही घरांच्या किंमतींमध्ये 10 ते 25% कपात केली होती. म्हाडा कडून शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 68,651 अर्ज आले आहेत. त्यामध्ये 49,284 अर्जदारांनी EMD भरले आहेत. म्हाडा लॉटरी मध्ये मागील वर्षी 4 हजार घरांसाठी सुमारे 1 लाख अर्ज आले होते.
म्हाडा कडून मुंबईत घरांसाठी लॉटरी
म्हाडा कडून 29 लाख ते 6.82 कोटीमध्ये विविध टप्प्यातील घरं उपलब्ध आहेत. उच्च उत्पन्न घरासाठी1 ते 6 कोटींची घरं उपलब्ध आहेत. ही घरं अंधेरी, अॅन्टॉप हिल, जुहू, गोरेगाव, ताडदेव, विक्रोळी, पवई भागामध्ये उपलब्ध आहेत.
मुंबई ताडदेव मध्ये सर्वात महागडं घर उपलब्ध आहे. ज्याची किंमत सुमारे 6.82 कोटी आहे. दक्षिण मुंबई मधील हे घर 1500 स्क्वेअर फूट चं आहे. या घरातून सीफेस आणि महालक्ष्मी रेसकोर्सचा भाग दिसतो. मुंबईमधील घरांसाठी यंदा 19 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे.