MHADA Lottery 2022: म्हाडा कडून 1200 घरांची पुढील महिन्यात निघणार सोडत
नवी मुंबईमध्ये 6,508 घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये घरं विकत घेणार्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही महिन्यात म्हाडा कडून 1200 घरांसाठी सोडत निघणार आहे. म्हाडा (MHADA) पुढील महिन्यात कोकण मंडळाकडून सोडत काढणार असल्याची माहिती मीडीया रीपोर्ट्स मधून समोर आली आहे. खास बात म्हणजे या इमारतींचे बांधकाम खाजगी विकासकांकडून करण्यात आले आहे. ठाणे (Thane) , नवी मुंबई (Navi Mumbai), कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) आणि वसई विरार (Vasai Virar) महापालिका हद्दीमध्ये 20% योजनेमधून ही घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
म्हाडाने 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात दसर्याच्या मुहूर्तावर 8984 घरांची सोडत काढली होती. त्याला मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. आता त्यांच्या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी त्यांच्या आवाक्यात घर खरेदी येण्यासाठी 20% योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात 4000 स्केअर फूट व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळातील बांधकाम होणार्या प्रोजेक्ट्स मध्ये 20% घरं राखीव ठेवण्यात आली आहे. ही घरं दुर्बल घटकांसाठी राखीव असतात.
दरम्यान म्हाडा प्रमाणेच सिडको कडून देखील देखील सोडत जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये 6,508 घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. 25 मार्च 2022 पर्यंत यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे.