Mexican DJ Rape Case: मेक्सिकन महिला डिस्क जॉकीवर बलात्कार, मुंबई येथून एकास अटक

आरोपी हासुद्धा डिस्क जॉकी (डीजे) असल्याची माहिती आहे.

Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

मेक्सिकन महिला (वय 31 वर्षे) डीजेवर वारंवार बलात्कार (Mexican DJ Rape Case) केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हासुद्धा डिस्क जॉकी (डीजे) असल्याची माहिती आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने गेल्या आठवड्यात तक्रारी दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीवर अटकेची कारवाई शुक्रवारी केली. आरोपी हा पीडितेचा व्यवस्थापक म्हणूनही काम पाहात असल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडिता आणि आरोपी सन 2019 पासून सोबत काम करत होते. कामाच्या कारणावरुन येत असलेल्या नियमंत संबंधातून आरोपीने पीडितेवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा उल्लेख तक्रारीत असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पीडिता आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सन 2017 मध्ये ओळख झाली. त्यानंतर पुढे ते प्रत्यक्षात परस्परांना भेटले तेव्हापासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान, आरोपीने पीडितेवर कथीतरित्या अत्याचार केले. जुलै 2019 मध्ये आरोपीने वांद्रे येथील निवासस्थानात पीडितेवर वारंवार बलात्कार केला. पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत तक्रारीत उल्लेख केला आहे. (हेही वाचा, Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणाचे CCTV Footage; पीडितेला मारहाण करताना दिसला आरोपी)

पीडितेने तक्रारीच्या माध्यमातून दावा केला आहे की, आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत असे. तिच्याअसाहयतेचा फायदा घेत असे. मिळालेले काम, असाईनमेंट रद्द करण्याची धमकी देत तो तिच्यावर बलात्कार करत असे. तसेच, दोघांनी परस्परांसोबत घालवलेल्या खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ दाखवूनही तो तिला बॅकमेल करत असे. आरोपीने सन 2020 मध्ये दुसऱ्या महिलेशी विवाह केला आहे. तरीही तो पीडितेला सातत्याने अश्लिल मेसेज पाठवत असे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध), 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर अत्याचार करणे किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीवर आधारित. सध्या तपास सुरू आहे.

बलात्कार ही अमानवी कृती आहे. जिस गुन्हा संबोधले जाते आणि जी शिक्षेस पात्र मानली जाते. वेगवेगळ्या देशांमध्ये या गुन्ह्याला वेगवेगळ्या शिक्षा आहेत. कायदेशीर दृष्टीकोनातून, बलात्कार म्हणजे जोडीदाराच्या संमतीशिवाय केले जाणारे कोणतेही लैंगिक कृत्य म्हणून ढोबळमानाने परिभाषित केले जाते. प्रदेशानुरुप त्याचे कायदे आणि व्याख्या विविध अधिकारक्षेत्रांमध्ये भिन्न असू शकतात. भारतात मात्र याला दंड, कारावास, सक्तमजूरी आणि अपवादात्मक प्रकरणामध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.