Court Summons Uddhav Thackeray, Sanjay Raut: उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना शिवडी कोर्टाचे समन्स, 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

या समन्सनुसार येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

उद्धव ठाकरे, संजय राऊत । File Photo

मुंबई येथील शिवडी कोर्टाने (Sewree court) शिवसेना (UBT) चे नेते उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले आहे. या समन्सनुसार येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना (UBT) मुखपत्र अशी ओळख असलेल्या दैनिक सामनामध्ये (Saamana) आपल्याबद्दल अवमानकारक मजकूर छापल्याचा दावा शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला आहे. यावरुनच त्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरुन शिवसेना (UBT) नेत्यांच्या सर्वोच्च आणि महत्त्वाच्या नेत्याला समन्स बजावण्यात आले आहे. जे सामना वृत्तपत्राचे संपादक आणि कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघाचे खासदार शेवाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (शिवरी कोर्ट) एस बी काळे यांनी सोमवारी हे समन्स जारी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्यसभा खासदार राऊत यांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाशी संबंधित असलेल्या शेवाळे यांनी या दोन्ही नेत्यांवर भारतीय दंड संहिता कलम 500 (बदनामीसाठी शिक्षा) आणि 501 (मुद्रण किंवा बदनामी करणे) बदनामीकारक लेख छापल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'सामना'च्या मराठी आणि हिंदी आवृत्तीत आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर छापल्याचा शेवाळे यांचा दावा आहे. (हेही वाचा, BMC Officer Assault Case: ठाकरे गटाकडून बीएमसी अभियंत्यास मारहाण, अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल; चौघांना न्यायालयीन कोठडी)

उद्धव ठाकरे हे सामनाचे मुख्य संपादक आहेत तर राऊत हे कार्यकारी संपादक आहेत. वकील चित्रा साळुंके यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत शेवाळे यांनी 29 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या सामनाच्या अंकाचा उल्लेख केला आहे. ज्यात `राहुल शेवाळे यांचा कराचीमध्ये हॉटेल, रिअल इस्टेट व्यवसाय आहे' या मथळ्यासह लेख प्रकाशित करण्यात आला होता. यावरच शेवाळे यांचा आक्षेप आहे.

दरम्यान, सामनातून करण्यात आलेल्या आरोपाचे राहुल शेवाळे यांनी खंडण केले आहे. या लेखातील सर्व आरोप आपल्या प्रतिष्ठेला आणि राजकीय कारकीर्दीला हानी पोहोचवण्याचा हा केवळ एक निष्फळ प्रयत्न आहे. लोकांसमोर त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचे शेवाळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.