ऑक्सी पल्स मीटर संदर्भातील संदेश फसवे, सायबर भामट्यांपासून सावध रहा; महाराष्ट्र सायबर विभागामार्फत नागरिकांना आवाहन

ऑक्सी पल्स मीटर (Oxy Pulse Meters) संदर्भातील फसव्या व्हाट्सअप संदेशाला बळी पडू नका. तसेच सायबर भामट्यांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत (Maharashtra Cyber Department) करण्यात आले आहे. कोरोना संकटाच्या काळात सध्या व्हाट्सॲप असा फसवा मेसेज फिरत आहे की, एक विशिष्ट मोबाईल ॲप डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले Body Pulse व रक्तातील Oxygen चे प्रमाण मोजू शकता. त्याकरिता स्वतंत्ररित्या Pulse Oxy Meter हे उपकरण घ्यायची गरज नाही. या मेसेजसोबत सदर मोबाईल ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली असते.

Messages regarding oxy pulse meters are fraudulent (PC - Twitter)

ऑक्सी पल्स मीटर (Oxy Pulse Meters) संदर्भातील फसव्या व्हाट्सअप संदेशाला बळी पडू नका. तसेच सायबर भामट्यांपासून सावध रहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत (Maharashtra Cyber Department) करण्यात आले आहे. कोरोना संकटाच्या काळात सध्या व्हाट्सॲप असा फसवा मेसेज फिरत आहे की, एक विशिष्ट मोबाईल ॲप डाऊनलोड केले तर तर, तुम्ही घरच्या घरी आपले Body Pulse व रक्तातील Oxygen चे प्रमाण मोजू शकता. त्याकरिता स्वतंत्ररित्या Pulse Oxy Meter हे उपकरण घ्यायची गरज नाही. या मेसेजसोबत सदर मोबाईल ॲप डाउनलोड करायची लिंक दिलेली असते. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागातर्फे सर्व नागरिकांना अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोबाईल ॲप्स वरून Oxygen च्या प्रमाणाचे आकडे हे अचूक नसतात.

मुळात Pulse-Oxy Meter या उपकरणात वापरली गेलेली प्रणाली आणि या मोबाईल ॲपमधील सॉफ्टवेअर यामध्ये बराच फरक आहे. त्या प्रणालीमध्ये वैद्यकीय निकष वापरले गेले आहेत, जे या मोबाईल ॲपमध्ये नाहीत. (हेही वाचा - मुंबई: फूटपाथवर राहणार्‍या असमा शेख या विद्यार्थीनीने महाराष्ट्र बोर्ड 10वी परीक्षेत मिळवले 40% गुण; युवा सेनेकडून पुढील शिक्षणासाठी मदत)

अशाप्रकारची मोबाइल ॲप सुरक्षित नाहीत आणि त्यांचा उपयोग सायबर भामटे तुमच्या मोबाईलमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी करू शकतात. शक्यतो अशी मोबाईल ॲप डाउनलोड करून वापरणे टाळा. जर अशी कोणतेही मोबाईल ॲप तुम्ही वापरत असाल, तर आपल्या मोबाईलच्या Settings मध्ये जाऊन या ॲप्सना ठराविक Access Allow करा.

दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात. त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कृपया घरीचं थांबावे आणि कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now