Megablock Timetable 29 December 2019: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; तर पश्चिम रेल्वे वर आज आणि उद्या रात्रकालीन जम्बोब्लॉकचे नियोजन; पहा संपूर्ण वेळापत्रक
मध्य रेल्वे वर माटुंगा (Matunga) ते मुलुंड (Mulund) तर हार्बर मार्गावर चुनाभट्टी /वांद्रे - (CSMT -Chunabhatti/ Bandra) स्थानकात ब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच पश्चिम मार्गावर वसई रोड (Vasai Road) ते विरार (Virar) या स्थानकांच्या दरम्यान आज आणि उद्या रात्री ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईची लाईफलाईन म्हणुन ओळखल्या जाणार्या लोकलचा वेग रविवारी मात्र मेगाब्लॉक (Megablock) मुळे मंदावला जातो. येत्या रविवारी म्हणजेच उद्या 29 डिसेंबर रोजी सुद्धा प्रवाशांना या लोकलच्या दिरंगाईचा त्रास सहन करावा लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार,उद्या मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गांवर विविध तांत्रिक कामानिमित्त सकाळपासून मेगाब्लॉकचे (Megablock) नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वे वर माटुंगा (Matunga) ते मुलुंड (Mulund) तर हार्बर मार्गावर चुनाभट्टी /वांद्रे - (CSMT -Chunabhatti/ Bandra) स्थानकात ब्लॉक घेण्यात येणार आहे तसेच पश्चिम मार्गावर वसई रोड (Vasai Road) ते विरार (Virar) या स्थानकांच्या दरम्यान आज आणि उद्या रात्री ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या मेगाब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या..
मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 पर्यंत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील, तसेच ब्लॉकमुळे विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकल थांबा घेणार नाहीत. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत लोकल फेऱ्या सुमारे 15 मिनिटे विलंबाने धावतील.
याशिवाय, विक्रोळी स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी विद्याविहार-मुलुंड दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर शनिवार-रविवार मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहेत. रात्री 12 ते पहाटे 5 या वेळेत हा ब्लॉक असल्याने शनिवारी रात्री 11.10 नंतर सुटणाऱ्या जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते चुनाभट्टी /वांद्रे स्थानकांच्या दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 पर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक असणार आहे. परिणामी, सीएसएमटी-वाशी बेलापूर पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येतील मात्र प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या सुरु असणार आहेत.
पहा ट्विट
पश्चिम रेल्वे
वसई रोड ते विरार स्थानकात रात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत शनिवार व रविवार दोन्ही रात्री जम्बोब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. अप-डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच रात्री काही लोकल फेऱ्या रद्द असून काही लोकल विलंबाने असतील.
मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे असा सल्ला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे.