Mega Block on Mumbai Local Trains: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या वेळा टाळून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

Megablock (Photo Credits:Twitter)

नियमित देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर ठाणे - कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या (13 डिसेंबर) 3 तासांचा मेगाब्लॉक आहे. या मार्गावर सकाळी 10.40 वाजल्यापासून तर दुपारी 3. 40 वाजेपर्यंत रेल्वे धावणार नाही. तसेच हार्बर रेल्वे (Harbour Railway) मार्गावर पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावर 5 तासांचा मेगाब्लॉक आहे. या मार्गावर सकाळी 11.05 पासून दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य आणि हार्बरवरील मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.37 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या जलद सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविली जाणार आहे. तर, कल्याण येथून सकाळी 10.26 ते दुपारी 3.19 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविली जाणार आहे. हे देखील वाचा- Mumbai: सँडहर्स्ट रोड स्टेशन वर महिलेला वाचवण्यासाठी RPF जवानाची रेल्वे रुळावर उडी (Watch Video)

मध्य रेल्वेचे ट्विट-

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच बेलापूर / नेरुळ - खारकोपर मार्गाचा मेगाब्लॉकमध्ये समावेश आहे. पनवेल / बेलापूर येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.49 ते दुपारी 4.01 पर्यंत बंद राहणार आहेत.