Medical Negligence in Latur: लातूरमध्ये रुग्णालयात बाळंतिणीच्या जीवाशी खेळ; प्रसूतीनंतर रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड पोटात ठेवून घातले टाके

3 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लातुरमधील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Photo Credit- Pixabay

Medical Negligence in Latur: लातूरमधील एका रुग्णालयातून एक संतापजनक महिती समोर आली आहे. तेथे प्रसुतीदरम्यान शस्रक्रिया(C-Section) केलेल्या महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेची प्रसूती चार महिन्यांअगोदर झाली होती. पोटातून पाणी येत असून त्रास होत असल्याने महिलेचे सीटीस्कॅन करण्यात आले. तेव्हा ही घटना उघडकीस आली. महिलेच्या पोटातून दीड बाय एक फुटांचा कापड (Clothe in woman stomach)राहिला होता. हे कापड डॉक्टरांकडून पोटात राहिल्याचा आरोप महिलेसह तिच्या नातेवाईकांनी केला आहे. ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून दीड बाय एक फुटांचा कापड बाहेर काढण्यात आला.(हेही वाचा: Mumbai: ठाणे स्थानकावर 20 वर्षीय महिलेची प्रसूती, 1 Rupee Clinic च्या कर्मचाऱ्यांचे यश)

हबीबा वसीम जेवळे असे त्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, अशी माहिती औसा रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे तीन महिने कापड पोटात राहिल्याने ही महिला मृत्यूच्या दारी जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे.(हेही वाचा: प्रशासनाचा ढिसाळ कारभार; रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने प्रसूतीनंतर अभिनेत्रीचा बाळासह मृत्यू)

तिच्यावर 23 एप्रिल रोजी हबीबावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र बाळ बाहेर काढल्यावर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कपड मध्येच ठेवून टाके घेण्यात आले. डिस्चार्ज नंतर महिलेच्या पोटातून पाणी येत असल्याने सदर महिला पुन्हा औसा ग्रामीण रुग्णालयात आली असता येथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे या महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले. तरीही टाक्यातून पू येत असल्याने औशातील दोन खाजगी डॉक्टरांचा उपचार या महिलेने घेतला. मात्र टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले.

सोनोग्राफी, सीटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता पोटात गाठ नाही तर चक्क दीड बाय एक फुटाचा कपडा (मॉब) निघाला. हा कपडा औशाच्या रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे.

पोटात नँपकिन निघालेल्या महिलेल्या प्रकरणावरून रूग्णालय प्रशासन गंभीर आहे. या संदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.