IPL Auction 2025 Live

Night Curfew आणि Lockdown सारख्या उपाययोजना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नाहीत; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र

Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

गेल्या महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग वाढू लागला आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या आढळून येणाऱ्या जिल्ह्यात लॉकडाऊनचे (Lockdown) नियम कडक करण्यात आले असून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, नाईट कर्फ्यू (Night Curfew) आणि लाकडाऊन (Lockdown) सारख्या उपाययोजना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, देशातील अनेक राज्यातील कारोना पुन्हा एकदा पसरत असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने सर्वाधिक संसर्ग असलेल्या राज्यात तज्ज्ञांची पथकं पाठवली होती. या पथकांनी कोरोना रुग्णांची संख्या जास्त असणाऱ्या राज्यातील संसर्ग रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवून काही सूचना केल्या होत्या. तसेच यासंदर्भात केंद्र सरकारला अहवाल पाठवला होता. या अहवालात या पथकांनी नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउनसारख्या उपाययोजना परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे. (वाचा - Coronavirus In Mumbai: मुंबईत वाढत्या रूग्णसंख्येच्या परिस्थितीमध्येही दादर च्या भाजीमंडईत गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा)

केंद्रीय पथनकाने केलेल्या सूचनांनुसार, सर्वाधित संसर्ग असणाऱ्या राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित घरं शोधणे, मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण असणाऱ्या ठिकाणाला कंन्टेमेंट झोन म्हणून घोषित करणे, आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची कोरोना चाचणी करून त्यांना योग्य उपचार करणे आदी सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, राज्यात सोमवारी 15051 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच नवीन 10671 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2144743 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 130547 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.07% झाले आहे.