Measles Outbreak in Mumbai: मुंबईत गोवरचे आव्हान वाढले, मृतांची संख्या आठवर पोहोचली

आता ती आठवर पोहोचल्याची माहिती आहे. 2021 मध्ये गोवरने झालेल्या मृतांची संख्या 92 इतकी होती. 2022 मध्ये तो आकडा 503 इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 6%नी वाढली आहे. साकीन उस्मान अन्साही नामीक बालकाचा गोवर आजाराने गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला.

Representational Image (Photo Credit: PTI)

मुंबईमध्ये गोवर (Measles) आजारामुळे होणाऱ्या मृतांची संख्या वाढली आहे. आता ती आठवर पोहोचल्याची माहिती आहे. 2021 मध्ये गोवरने झालेल्या मृतांची संख्या 92 इतकी होती. 2022 मध्ये तो आकडा 503 इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 6%नी वाढली आहे. साकीन उस्मान अन्साही नामीक बालकाचा गोवर आजाराने गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. अवघ्या 13 महिन्यांच्या या बालकाला गोवरची लागण झाली होती. त्यातच त्याच्या फुफ्फुसालाही संसर्ग झाल्याने त्याला श्वसनास त्रास जाणवत होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. नागरी प्रशासनाने या बालकाच्या मृत्यूचे कारण सांगितले सकिना उस्मान अन्सारी यांचा गुरुवारी सायंकाळी कस्तुरबा रुग्णालयात गोवर ब्रॉन्कोप्न्यूमोनियासह गोवर आणि सेप्टिक शॉक असल्याचे सांगितले.

दरम्यान, गोवर आटोक्यात आणण्याचे महत्त्वाचे आव्हान मुंबई महापालिकेसमोर उभे राहिले आहे. महापालिकेच्या एका आकडेवारीनुसार पाठिमागील 26 ऑक्टोबरपासून आतापर्यंत मुंबईत 7 बालकांचा गोरमुळे बळी गेला आहे. सध्या पूर्ण शहरात 61 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची अधिकृत माहिती आहे. दरम्यान, गोवरची साथ वाढत असताना मुंबईत 20 हजारांहून अधिक मुलांना गोवरची पहिली किंवा दुसरी लस मिळाली नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे महापालिका मोठ्या प्रमाणावर लसिकरण मोहीम हाती घेत असल्याचे समजते.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दक्षिण मुंबईतील राज्य सचिवालयात झालेल्या बैठकीत गोवर उद्रेक परिस्थितीचा आढावा गुरुवारी घेतला आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी धार्मिक नेत्यांची मदत घेण्याचे निर्देश बीएमसीला दिले. सीएम शिंदे म्हणाले की, लसीकरणाच्या कमतरतेमुळे हा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे आणि ते म्हणाले की, स्थानिक धार्मिक प्रतिनिधी आणि समाजातील प्रमुख लोकांशी संपर्क साधून लसीकरणाच्या आवश्यकतेबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.