Measles outbreak in Mumbai: मुंबईत गोवर संसर्गाचे आव्हान कायम, गोवंडीत पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

गोवरचे नवनवे रुग्ण प्रतिदिन नोंदवले जात आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे. गोवंडी येथे नुकताच गोवर (Measles in Mumbai) संसर्गामुळे पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई शहरात उद्भवलेले गोवर (Measles outbreak in Mumbai) संसर्गाचे आव्हान अद्यापही कायम आहे. गोवरचे नवनवे रुग्ण प्रतिदिन नोंदवले जात आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचे मोठे आव्हान सरकारसमोर उभे ठाकले आहे. गोवंडी येथे नुकताच गोवर (Measles in Mumbai) संसर्गामुळे पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये नऊ जणांचा गोवर संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिका (BMC) गोवर उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी गोवरचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळतो आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका हद्दीमध्ये गोवर संक्रमीत रुग्णांची विद्यमान संख्या 475 वर पोहोचलीआहे. गोवरमुळे शहरात झालेल्या मृतांची संख्या 5 इतकीआहे. दरम्यान, शहरात गोवरमुळे झालेल्या मृत्यूबाबत सविस्तर अहवाल येणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, 10 डिसेंबरपर्यंत राज्यात राज्यात आतापर्यंत 17 बालकांचा मृत्यू गोवरमुळे झाला आहे. (हेही वाचा, Measles Outbreak in Mumbai: गोवरच्या लसीकरणाचा पुढील टप्पा 15 ते 25 जानेवारी दरम्यान करणार आयोजित)

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीत आणि माहितीमध्ये म्हटले की, गोवंडीमध्ये 5 महिन्यांच्या एका बालकाचा मृत्यू 13 डिसेंबर रोजी झाला. तर 37 मुलांना गोवर संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 26 मुलांना उपचार घेऊन बरे वाटल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. दरम्यान, या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी आरोग्य विभागआणि प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेऊन असणार आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती वारंवार घेतली जाणार आहे.

दरम्यान, जगभरामधील गोवर संक्रमितांची 2021 ची आकडेवारी सांगते की, जगभरात गोवरची 9 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी 1,28,000 रुग्णांचे प्राण गोवरमुळे गेले. तसेच, जगभरातील 22 देशांना गोवर उद्रेकाचा मोठा सामना करावा लागला. प्रामुख्याने लसीकरणाचा अभाव. लसीकरणातील अडथळे आणि लसीकरणास झालेला विलंब यामुळे गोवरचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif