Sanjay Raut, Sunil Raut यांना धमकी प्रकरणात बुचकळ्यात टाकणारा ट्वीस्ट; राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी निकटवर्तीय मयुर शिंदे चा बनाव - पोलिसांची माहिती
तसेच त्याने काही महिन्यांपूर्वी शिवसेनेतून एनसीपी मध्ये पक्षप्रवेश केला होता.
मागील आठवड्यात शरद पवार यांच्या पाठोपाठ संजय राऊत (Sanjay Rraut) आणि सुनिल राऊत (Sunil Raut) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. आता या प्रकरणामध्ये बुचकळ्यात टाकणारा ट्वीस्ट आला आहे. दरम्यान राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी हा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये मयुर शिंदे (Mayur Shinde) या सुनील राऊतांचा निकटवर्तीयाला अटक झाली आहे. दरम्यान फोन वरून मयुरने स्वतः धमकी दिलेली नाही पण त्याच्या लोकांकडून हा फोन कॉल करण्यात आला होता असं सांगण्यात आलं आहे.
राऊत बंधूंची जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केलेली आहे. मयुर शिंदे गेली काही वर्ष सुनील राऊत यांच्यासोबत काम करत आहे. मुलुंड, भांडुप, विक्रोळी परिसरात त्याचा दबदबा आहे. सध्या मयुर शिंदे एका वेगळ्या पक्षासाठी काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धमकीचा बनाव रचण्यासाठी मयुर शिंदेचा वापर केल्याचं सांगत आता विरोधकांनीही राऊतांवर टीकेचे बाण सोडले आहे. अनेकांनी सोशल मीडीयातून आपलं मत मांडलं आहे.
पहा ट्वीट्स
काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि सुनिल राऊत यांना धमकीचा कॉल आला. सुनिल राऊत यांनी हा फोन उचलला होता. त्यामध्ये राऊतांनी सकाळी 9 चा भोंगा (पत्रकार परिषदा) बंद केल्या नाहीत तर गोळ्या टाकून ठार मारू असा इशारा त्यामध्ये देण्यात आला होता. या फोन कॉल नंतर राऊत बंधूंनी पोलिसांत तक्रार केली. राज्य गृहमंत्र्यांनाही त्याची माहिती दिली होती. दरम्यान संजय राऊत हे खासदार आहेत आणि सुनील राऊत हे आमदार आहेत. सध्य दोघेही ठाकरे गटासोबत आहे.