माथेरानच्या 'टॉय ट्रेन'ला अपघात
माथेरानची फुलराणी म्हणून ओळख असणाऱ्या 'ट्रॉय ट्रेन'ला रविवारी अपघात झाला आहे.
माथेरानची फुलराणी म्हणून ओळख असणाऱ्या 'टॉय ट्रेन'ला रविवारी अपघात झाला आहे. तर या अपघातात ट्रेनचे डब्बे रुळांवरुन घसरले आहेत. मात्र पावसाळ्यानंतर शनिवारीच ही टॉय ट्रेन माथेरानला फिरायला येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी चालू करण्यात आली होती.
माथेराच्या पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटता येण्यासाठी टॉय ट्रेनची सुविधा मध्य रेल्वेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच या ट्रेनसाठी एसीचे डब्बे आणि नवीन रंगपद्धती करण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे. मात्र रविवारी अमन लॉज ते माथेरान मार्गावरुन ही ट्रेन जात असताना त्याची दोन चाके अचान रेल्वे रुळांवरुन खाली घसरली. परंतु यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर ही ट्रेन दुपारी 2 वाजता पुन्हा प्रवाशांसाठी चालू करण्यात आली.
मध्य रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन टॉय ट्रेनसाठी योग्य ती उपाययोजना करावी असे तेथे येणाऱ्या प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीसुद्धा मिनी ट्रेनचे डब्बे रुळांवरुन घसरुन पडल्याने त्याची सेवा पूर्णपणे बंद केली होती. मात्र शनिवारी पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी चालू झालेली माथेरानची फुलराणीच्या या अपघातामुळे प्रवाश्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.