Fire Engulfs Library In Pune: पुण्यातील नवी पेठ परिसरातील वाचनालयाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ
सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत फर्निचर, संगणक, पुस्तकांसह संपूर्ण वाचनालय जळून खाक झाले.
Fire Engulfs Library In Pune: पुण्यातील नवीन पेठ परिसरातील (Navi Peth Area) वाचनालयात (Library) गुरुवारी सकाळी भीषण आग (Fire) लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळाने आग आटोक्यात आल्याचे पुणे शहर अग्निशमन विभागाने सांगितले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत फर्निचर, संगणक, पुस्तकांसह संपूर्ण वाचनालय जळून खाक झाले.
पुणे शहर अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी राजेश जगताप यांनी सांगितले की, सकाळी 6.30 वाजता वाचनालयाला आग लागली. आम्ही 4 फायर ब्रिगेड आणि 2 पाण्याचे टँकर वापरून आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची तीव्रता भीषण असल्याने लायब्ररी जळून खाक झाली. या आगीत वाचनालयातील फर्निचर, कॉम्प्युटर आणि पुस्तकांचीही जळून राख झाली आहे. (हेही वाचा -Pune Fire: घोरपडे पेठे मध्ये भीषण आग; 5 घरं जळून खाक)
पुण्यातील नवी पेठ परिसरातील वाचनालयाला भीषण आग; पहा व्हिडिओ -
यापूर्वी 16 ऑक्टोबरला मुंबईतील अंधेरी भागातील रिया पॅलेस इमारतीला लागलेल्या आगीत तिघांना जीव गमवावा लागला होता. या घटनेची माहिती देताना कूपर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंद्रप्रकाश सोनी, कांता सोनी आणि पेलुबेता अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (हेही वाचा -Mumbai Fire: मुंलूड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू)
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सांगितले की, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.