Aurangabad Fire: औरंगाबादमधील शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या आहेत.

Aurangabad Fire (PC - File Image)

Aurangabad Fire: आज सर्वत्र मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र, औरंगाबाद शहरात या सणाला गालबोट लागल्याची घटना घडली. शहरातील शहागंज परिसरात कपडा मार्केटमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास शहागंज परिसरात असलेल्या न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. त्यानंतर काही वेळातचं ही आग जास्त भडकली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. (हेही वाचा - Mumbai Air Quality index: प्रदुषणात मोठी वाढ, मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली, दिल्लीपेक्षाही ढासळली; नागरिकांना श्वसनाशी संबंधीत विकार)

आज मकर संक्रांतीच्या दिवशी ही आग लागल्याने कपडा दुकानावर संक्रांत आली. अद्याप आगीचं नेमक कारण समजू शकलेलं नाही. शहरातील गजबजलेल्या भागातील कपडा मार्केटला आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.