Mumbai Fire: मलबार हिल्सच्या हँगिंग गार्डन जवळील इमारतीला भीषण आग; 8 जणांना बाहेर काढण्यात यश (Video)
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
मुंबईतील (Mumbai) मलबार हिल्सच्या (Malabar Hill) हँगिंग गार्डन जवळील इमारतीला भीषण आग (Fire) लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अद्याप कोणत्याही जीवित हानीची नोंद झालेली नाही. परिस्थितीचे गांभीर्य पाहता मदत व बचाव कार्य जोरात सुरु आहे. मुंबई अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, इमारतीतून आतापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
लॅसपालमास इमारतीच्या 5 व्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागली आहे. बुधवारी रात्री साधारण 7.45 वाजता ही आग लागली. त्यानंतर परिसरात एकाच गोंधळ उडाला.
ही आग शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील बंगल्याच्या, कर्मचारी वसाहतला लागली आहे. आतापर्यंत या इमारतीमधून आठ जणांना बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. इमारतीत आणखी काही लोक अडकले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करीत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ब्रिगेडने डझनभर अग्निशमन इंजिन तैनात केले आहेत. रस्त्यावर वाहने बेकायदा पार्किंग केल्यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना इमारतीत पोहोचण्यास थोडी अडचण निर्माण झाली, मात्र आता काम युद्धपातळीवर चालू आहे.
(हेही वाचा: Mumbai Fire: कुर्ला-पश्चिम येथील मेहता इमारतीला भीषण आग; अग्निशमनदलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई येथील कुर्ला पश्चिम (Kurla West) परिसरातील मेहता इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत 8 पेक्षा अधिक गॅस सिलिंडरचा स्फोट झा होता. मिळालेय माहितीनुसार ही इमारत तब्बल 80 वर्ष जुनी आहे, मात्र आग नक्की कशाने लागली याचे कारण समजू शकले नाही.