Chhatrpati Sambhaji Nagar LPG Cylinder Blast: छत्रपती संभाजीनगर येथे सिलिंडरचा भीषण स्फोट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, आग विझवण्याचे काम सुरु
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारमध्ये सिलिंडरची टाकी भरताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Chhatrpati Sambhaji Nagar LPG Cylinder Blast: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कारमध्ये सिलिंडरची टाकी भरताना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यात निमखेडा येथे घडली आहे. स्फोटामुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा- राजस्थानमध्ये ट्रकच्या धडकेत लागली कारला आग; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडा येथे सिलिंडर टाकीची वाहतूक केली जात होती. त्यावेळी अचानक एका टाकीचा मोठा स्फोट झाला. कारमधील सिलिंडरची टाकी थेट बाहेर पडली होती. त्यामुळे भीषण स्फोट झाला.स्फोटामुळे धूरांचे लोट परिसरात पसरत आहे. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेवेळी परिसरातील अनेक लोक उपस्थित होते. स्फोटाचा आवाज ऐकून अनेक जण बाहेर आले आणि त्यावेळी अनेकांनी घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे. घटनेची माहिती पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.स्फोटात परिसरातील एका मोठा दुकानाचे नुकसान झाले अशी माहिती समोर आली आहे. आग पसरत एका दुकाना पर्यंत पोहचली होती. त्यामुळे दुकानाला देखील आग लागली होती. सुदैवाने आगीची घटना पाहून नागरिकांनी पळापळ सुरु केली. दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं होते.