IPL Auction 2025 Live

EVM हटाव मागणीसाठी जनआंदोलन; 9 ऑगस्ट, क्रांती दिनादिवशी राजू शेट्टी काढणार लॉंगमार्च

यासाठी 'ईव्हीएम हटाव' राष्ट्रीय आंदोलन हाती घेतले असून, आंदोलनाचा भाग म्हणून 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आझाद मैदान ते चैत्यभूमीदरम्यान लाँगमार्च (Longmarch) काढण्यात येणार आहे.

राजू शेट्टी (Photo Credit : Facebook)

2014 मध्ये ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळी अनेकांनी ईव्हीएम (EVM) मशीनवर निकालांचे खापर फोडले होते. आता पुन्हा यंदाच्या निवडणुकांवेळीही असाच प्रकार घडला आहे. ज्या प्रकारे भाजपने (BJP) देशात विजय मिळवला आहे, ते पाहून ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचे इतर अनेक पक्षांचे म्हणणे आहे. यासाठी 'ईव्हीएम हटाव' राष्ट्रीय आंदोलन हाती घेतले असून, आंदोलनाचा भाग म्हणून 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आझाद मैदान ते चैत्यभूमीदरम्यान लाँगमार्च (Longmarch) काढण्यात येणार आहे.

शाहू स्मारक भवन येथे ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलन यांच्यावतीने 'ईव्हीएमचे सत्य' विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते, त्यामध्ये हा निर्णय घेतला गेला आहे. यावेळी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, 'निवडणुका पारदर्शक वातावरणात होतात का हे पाहण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र आयोगाचे सदस्यच भितीच्या वातावरणात वावरत आहेत. निकालामध्ये फेरफार झाले आहेत, त्यामुळे खरे निकाल जनतेच्या समोर यायला हवेत. अशा परिस्थितीत भारताला लोकशाहीवादी देश असे संबोधणे चुकीचे ठरेल.;

ईव्हीएम बाबत निर्माण झालेले प्रश्न -

जनतेने ज्या उमेदवाराला मत दिले आहे, ते मत त्याच उमेदवाराला गेले आहे की नाही हे जाणून घेण्याचा हक्क जनतेला आहे. मात्र निवडणुकीत ज्या प्रकारे ईव्हीएमचा वापर झाला आहे ते पाहून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. याच बाबतील 'ईव्हीएम हाटाव' या मागणीसाठी जनआंदोलन सुरु करण्यात येणार आहे.