Marathwada Rain: मराठवाड्यात वीज कोसळून एकूण 6 जणांचा मृत्यू, मृतांत मायलेकीचा समावेश
मराठवाड्यातील बीड, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यात वीज कोसळून एकूण 6 जण मृत्युमुखी पडले आहेत.
सध्या मराठवाड्यात (Marathwada) जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यावेळी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट (Lightning) देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोन दिवसांत वीज कोसळण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे पाहायला मिळाले. मागील दोन दिवसात मराठवाड्यात वीज कोसळून एकूण 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. सोबतच काहीजण जखमी देखील झाले आहेत. तसेच वीज पडून अनेक जनावरांचं देखील मृत्यू झाला आहे. परभणी तालुक्यातील गंगाखेडच्या सविता विठ्ठल कतारे (वय 40 वर्षे), निकिता विठ्ठल कतारे (वय 18 वर्षे) असे मयत मायलेकीचे नावं आहेत. (हेही वाचा - Shahnawaz Hussain Health Update: माजी मंत्री शाहनवाज हुसैन यांना Angioplasty नंतर आज हॉस्पिटल मधून सुट्टी; 15 दिवस आरामाचा सल्ला)
मराठवाड्यातील बीड, नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यात वीज कोसळून एकूण 6 जण मृत्युमुखी पडले आहेत. बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड फाट्याजवळील सोनिमोहा शिवारात शुक्रवारी वीज पडून संगीता मच्छिंद्र कराड (वय 48) ही शेतमजूर महिला ठार झाली. दुसऱ्या घटनेत परभणीच्याच घटनेत भेंडेवाडी येथे दुपारी चारच्या सुमारास वीज पडल्याने ओंकार किशन घुगे (वय 14 वर्षे) हा सुद्धा मरण पावला. तसेच, नांदेडच्या किनवट तालुक्यातील साईनाथ दत्ता घुगे (वय 26 वर्षे) याचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे.
दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातील सहा जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा तहसीलदारांनी केला आहे. या पावसादरम्यान फुलंब्री तालुक्याच्या पाथ्रीमधील आबाराव पाथ्रीकर यांच्या गोठ्यावर अचानक विज कोसळली. यात गोठ्यातील दोन गायींचा मृत्यू झाला.