मराठा आरक्षण: मराठा समाजाला विशेष प्रवर्गाअंतर्गत आरक्षण- मुख्यमंत्री

गेल्या काही दिवासांपासून सतत चर्चेत असलेला मराठा आरक्षणचा मुद्दा निकाली निघाला आहे.

मराठा आरक्षण: मराठा समाजाला विशेष प्रवर्गाअंतर्गत आरक्षण- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवासांपासून सतत चर्चेत असलेला मराठा आरक्षणचा मुद्दा निकाली निघाला आहे. मराठा समाजाला एससी-बीसी प्रवर्गाअंतर्गत आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कोठेही धक्का लावलेला नसून स्वतंत्र कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशानापूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मागासवर्ग आयोगाने अहवालात सादर केलेल्या तीनही शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत. तसंच मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास वर्ग या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कायदा करण्यात येणार असून मंत्रीमंडळ उपसमिती आरक्षणाचे स्वरुप ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजासाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. सामाजिक आर्थिक मागास वर्ग (Socialy economiclay backward class)असा हा प्रवर्ग आहे.

मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केल्यानंतर लवकर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2018 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).