Maratha Mukh Morcha in Kolhapur: संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सतेज पाटील, धैर्यशील माने यांसह कोल्हापूर येथील मूक मोर्चा आंदोलनातील मान्यवरांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

या वेळी या मान्यवरांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मकता व्यक्त केली.

Maratha Mukh Morcha in Kolhapur | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि इतर काही मागण्यांच्या मुद्द्यावर कोल्हापूरयेथे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shrimant Chhatrapati Shahu Maharaj) , संभाजीराजे छत्रपती, हसन मुश्रीफ, सतेज पाटील (Satej Patil), धैर्यशील माने, प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी या मान्यवरांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मकता व्यक्त केली. तसेच, सर्व प्रकारची कायदेशीर आणि न्याय्य लढाई लढण्याचे सूतोवाच केले. या शिवाय राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पाठपूरावा करण्याचा मनोदयही या वेळी व्यक्त करण्यात आला. पाहा मान्यवरांनी काय भूमिका व्यक्त केली.

पंतप्रधानांच मत कळायला हवं- श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा मूक मोर्चावेळी म्हटले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा. पंतप्रधानांनी जर मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडविण्याची भूमिका घेतली तरच हा प्रश्न मार्गी लागू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरोधात गेला आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणाहूनच आपल्याला पुन्हा नवी सुरुवात करावी लागणार आहे. फेरविचार याचिका आपण दाखल करु शकतो. पण त्याचा निकाल लागण्यात पुन्हा खूप वेळ लागू शकतो. त्यातून काही हाती लागेलच असेही काही नाही.त्यामुळे आता नवा कायदा आणल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. या आदी अनेक वेळा कायदा करण्या आला आहे. घटनादुरुस्ती झाली आहे. मग याच वेळी का समस्या येत आहे हे समजत नाही, असे मत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी या वेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार- संभाजीराजे छत्रपती

मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासठी मुबईला जाणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. ते मराठा मूक मोर्चाची कोल्हापूर येथे सांगता झाल्यावर बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला हवी- सतेज पाटील

मराठा मूक मोर्चा दरम्यान सतेच पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली. या वेळी ते म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घ्यायला हवी. संभाजीराजे यांनी मांडलेल्या भूमीकेशी राज्य सरकार 100% सहमत आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर कसा तोडगा काढायचा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे सर्वजण आपल्यासोबत चर्चा करु इच्छितात. त्यामळे राज्य पातळीवरची चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला आले पाहिजे असे सतेज पाटील यांनी म्हटले.



संबंधित बातम्या

Maratha Reservation: मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्याची मागणी

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना