Mansukh Hiren Death Case: मनसूक हिरेन यांच्या पत्नीचा Sachin Vaze यांच्यावर गंभीर आरोप; सचिन वाझे यांची त्रोटक प्रतिक्रिया

या वेळी वाझे यांनी फारसे भाष्य करणे टाळले. हिरेन यांच्या पत्नीने तुमच्यावह हत्येचा आरोप केला आहे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता 'याबाबत तुम्ही त्यांनाच जावून विचारा' असे वाझे म्हणाले.

Mansukh Hiren Death Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई क्राइम ब्रांचमधील अधिकारी सचिन वाझे ( Sachin Vaze) यांच्यावर मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांच्या पत्नी विमाल हिरेन ( Vimala Hiren) यांनी गंभीर आरोप केले आहेत. विमला हिरेन यांचा जबाब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभत वाचून दाखवला. या जबाबामध्ये मनसुख यांच्या मृत्यूमागे (Mansukh Hiren Death Case) सचिन वाझे यांचाच हात असल्याचा आरोप आहे. दरम्यान, या आरोपावरुन प्रसारमाध्यमांनी सचिन वाझे यांना विचारले असता त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.

देवेंद्र फडणवीस यांनी विमला हिरेन यांचा जबाब मिळवला आहे. हा जबाब त्यांनी थेट विधानसभेतच वाचून दाखवला. या जबाबात करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या आरोपत म्हटले आहे की, मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच घडवून आणली. ही हत्या झाल्यानंतर हिरेन यांचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला, असा संशय मनसुख यांच्या पत्नाला आहे. तसेच, अंबानींच्या घराबारे स्फोटकं भरुन जी गाढी ठेवण्यात आली ती गाडी 5 फेब्रुवारी पर्यंत सचिन वाझे हे वापरत होते, असेही या जबाबात म्हटले आहे. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबलं– गृहमंत्री अनिल देशमुख)

या जबाबात पुढे म्हटले आहे की, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपूर्वी ते सचिन वाझे यांच्यासोबत तपासासाठी जात येत असत. हे जाणे येणे तीन दिवसांपासून सुरु होते. विमला यांनी म्हटले आहे की, वाझे यांनी मनसुख यांना सांगितले की, तुम्ही दोन तीन दिवस अटक व्हा. तुम्हाला जामिनावर सोडते, असेही त्यांना सांगण्यात आल्याचे म्हटले आहे. एकूण प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांना निलंबीत करण्यात यावी अशी मागणी विधानसभेत केली.

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणाबाबात प्रसारमाध्यमांनी सचिन वाझे यांना विचारले. या वेळी वाझे यांनी फारसे भाष्य करणे टाळले. हिरेन यांच्या पत्नीने तुमच्यावह हत्येचा आरोप केला आहे, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता 'याबाबत तुम्ही त्यांनाच जावून विचारा' असे वाझे म्हणाले. याशिवाय मनसुख यांच्याकडे असलेली गाडी हे सचिन वाझे वापरत होते असाही आरोप आहे, असे विचारले असता 'हा केवळ एक आरोप आहे' असे वाझे यांनी म्हटले आहे. वाझे यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य केले नाही.