Mansukh Hiren Death Case: पोलीस अधिकारी सचिन वाझे थोड्याच भूमिका स्पष्ट करणार; प्रसारमाध्यमांना दिली माहिती
सचिन वाझे यांना प्रसारमाध्यमांनी गाठले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. प्रसारमाध्यमांचे प्रश्न आणि दबाव याला कोणत्याही प्रकारे बळी न पडता वाझे यांनी अत्यंत संयतपणे काही काळ वाट पाहण्यास सांगितले.
मनसुख हिरेन प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) चर्चेत आलले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze ) थोड्याच वेळात आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहेत. सचिन वाझे यांची क्राईम ब्रँच विभागातून इतर ठिकाणी बदली करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुंख ( Anil Deshmukh) यांनी विधिमंडळात दिली. त्यानंतर वझे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी बोलताना वाझे यांनी सांगितले की, मी थोड्याच वेळात माझे अधिकृत स्टेटमेंट देणार आहे. तोपर्यंत काही काळ वाट पाहा.
सचिन वाझे यांना प्रसारमाध्यमांनी गाठले आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. प्रसारमाध्यमांचे प्रश्न आणि दबाव याला कोणत्याही प्रकारे बळी न पडता वाझे यांनी अत्यंत संयतपणे काही काळ वाट पाहण्यास सांगितले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना अधिक काही विचारण्याचा प्रयत्न केला. यावर वझे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आपण थोड्याच वेळा स्टेटमेंट देणार असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळात बोलताना सांगितले की, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रँच विभागातून इतर ठिकाणी बदली करण्यात येणार आहे. सचिन वाझे यांना निलंबीत करा अशी मागणी करत विरोधी पक्ष या आधीच आक्रमक झाला होता. विधानपरिषदेत विरोधी पक्षाचा हाच आक्रमकपणा आजही पाहायला मिळाला. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाला गृहंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात उत्तर दिले. (हेही वाचा, Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांची बदली; महाविकासआघाडी सरकार कोणासही पाठिशी घालणार नाही- अनिल देशमुख)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे त्यांना पदावरुन निलंबीत करावे अशी मागणी राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. हीच मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लावून धरली. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणी विधान परिषद सभागृहात आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. सभागृह काही काळ स्थगित करावे लागले.
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2021 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

