ATS On Mansukh Hiren Death Case: सचिन वाझे यांचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार- एटीएस

त्यांचा ताबा महाराष्ट्र एटीएसला (Maharashtra Anti Terrorism Squad) मिळाल्यानंतर बऱ्याच बाबी पुढे येतील. त्यामुळे वाझे यांचा ताबा मिळविण्यासाठी एटीएस (ATS ) न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जगजीतसिंह यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

ATS, Sachin Vaze | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात ( Mansukh Hiren Death Case) सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा हात असल्याचे पुढे येत आहे. सचिन वाझे सथ्या एनआयएच्या ताब्यात आहेत. त्यांचा ताबा महाराष्ट्र एटीएसला (Maharashtra Anti Terrorism Squad) मिळाल्यानंतर बऱ्याच बाबी पुढे येतील. त्यामुळे वाझे यांचा ताबा मिळविण्यासाठी एटीएस (ATS ) न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करते आहे. या प्रकरणात एटीएसने बराच तपास केला आहे. अद्यापही हा तपास कायम असल्याचे एटीएस प्रमुखांनी सांगितले.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली सीम कार्ड ही गुजरातमधील एका कंपनीच्या नावे मिळविण्यात आली आहेत ही सर्व समीकार्ड एका बुकीकडून प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. सचिन वाझे यांच्या सांगण्यावरु ही सर्व सिमकार्ड नरेश गोर याने आरोपी विनय शिंदे याच्याकडे दिल्याचे प्रतामिक चौकशित पुढे आल आहे. विनायक शिंदे हा लखनभैय्या एन्काउंटर प्रकरणात झालेल्या अटकेतील एक आरोपी आहे. तो पॅरोलवर होता. तेव्हा त्याने हा गुन्हा केला.त त्यानेच मनसुख याला घटनास्थळी बोलवून घेतल्यचे आणि हत्येत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. आरोपीने घटनासथळी जाऊन गुन्हा कसा केला याचेही प्रत्यक्षिक पोलीसांनी केल्याचे एटीएसने आज सांगितले.. घटनास्थळावर कोणताही पुरावा सापडला नाही. परंतू, एटीएसने केलेल्या तपासात अनेक पुरावे पुढे आले आहेत, असेही एटीएसने म्हटले आहे.

दरम्यान, मनसूख हिरेन प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यासाठी एटीएसला सचिन वाझे यांचा ताबा हवा आहे, असेही जगजीतसिंह यांनी सांगितले. (वाचा - महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनाची लागण ते कोरोनामुक्ती पर्यंतची माहिती देत मीडियातील काही खोट्या वृत्तांना फेटाळलं Watch Video)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ सापडली होती. ही गाडी सचिन वाझे यांच्या मालकिची असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा ठाण्याच्या खाडीत मृतदेह सापडला. त्यानंतर या प्रकरणाचे गुढ अधिक वाढले. त्यानंतर या प्रकरणातील गुंतागुंतही वाढत गेली. जिलेटीनच्या कांड्या सापडल्याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएस करते आहे.