Amit thackary PC Twitter

Manse VS BJP: अमित ठाकरे सद्या सोशल मीडीयावर एका गोष्टीमुळे फार चर्चेत आहे. दोन दिवसांपुर्वी अमित ठाकरे यांत्या नाशिक दौऱ्यादरम्यान सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील टोल नाका थांबवण्यात आले होते. याचा राग मनात घरात मनसे कार्यकर्त्यांनी संपुर्ण टोलनाका फोडला होता. या संदर्भात अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सर्वं घडना सांगितली. माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांनी टोल नाक्यावर  अर्धातास थांबवल्याचे सांगितले. आणि काही कर्मचारी घंमडी भाषेत बोलत असल्याचे सांगितले. याच  पार्श्वभुमीवर राज्यभरात भाजप आणि मनसे विरुध्दात टोलेबाजी चालत आहे.

भाजपानी सोशल मीडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  अमित ठाकरे या व्हिडिओच्या माध्यमातून टार्गेटपॉईंटवर असल्याचे दिसून येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी टोल फोडल्यामुळे मनसे विरुध्द भाजप असं नवीन युध्द पाहायला मिळत आहे. मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर हल्लाबोल केला होता.

“अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा” असा टोला भाजपाने लगावला आहे. भाजपाने व्हिडिओच्या माध्यमातून अतिम ठाकरे यांनी बोचरी टिका केली आहे. राज ठाकरे आणि टोलनाका यांच जुणं नात आहे असं या व्हिडिओतून सांगण्यात आले आहे. सिन्नरच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी तीन ते साडेतीन मिनीटे थांबवली.याच कारणांवरून अमित ठाकरे यांचे कार्यकर्ते  भडकून टोलनाक्यावर हल्ला करत फोडून काढला. हे सर्व प्रकरणा अमित ठाकरे यांना समजताच त्यांना असवी आंनद लपविता आला नाही असं या व्हिडिओतून सांगणात आले आहे. अमित ठाकरे माध्यमांशी खोटं बोलत आहे असं भाजपाने सांगितले आहे.

दरम्यान मनसेने ही टीका सहन न करता भाडपावर आक्रमक हल्ला केला आहे. सोशल मीडियावर मनसेचे संदिप देशपांडे यांनी या व्हिडिओला प्रत्युत्तर दिले आहे. “मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपाला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का ?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.