Thane: मानपाडा शाळेत चौथीच्या विद्यार्थ्याचा बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

जेवताना तो अचानक कोसळला. एका शिक्षकाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Thane: मानपाडा येथील ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) शाळेच्या आवारात बुधवारी मध्यान्ह भोजनाच्या सुटीदरम्यान एका 10 वर्षीय विद्यार्थ्याचा बुशुद्ध झाल्यानंतर मृत्यू (Death) झाला. कापूरबावडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तथापि, मुलाच्या कुटुंबीयांनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. प्राप्त माहितीनुसार, दुपारी 3 वाजताच्या सुमारास शाळेच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये मुलाला उभे असल्याचे विद्यार्थ्यांनी पाहिले होते. जेवताना तो अचानक कोसळला. एका शिक्षकाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून पोलिस शाळेतील सीसीटीव्ही फुटेज पाहत आहेत. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे कर्मचारी बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, "आम्ही शाळेला भेट दिली असून घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे." (हेही वाचा - Mumbai Local Viral Video: विरार स्थानकात चालत्या ट्रेनमधून घाईत उतरण्याच्या नादात पडलेल्या महिलेला हेड कॉस्टेबल यामिनी यांनी दिलं जीवनदान (Watch Video))

मानपाडा येथील मनपा शाळा क्रमांक 64 मध्ये इयत्ता चौथीत शिकलेला तरुण घोडबंदर रोड, ठाणे येथे आई-वडील आणि दोन भावंडांसोबत राहत होता. मुलाचे वडील ठाण्यात सुरक्षा रक्षक आहेत. प्राप्त माहितीनुसार, ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. हा मुलगा दुपारच्या जेवणाच्या वेळी शाळेच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये उभ्या असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी पाहिला होता. यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला. विद्यार्थ्यांनी तात्काळ यासंदर्भात शिक्षकांना माहिती दिली.

दरम्यान, एका शिक्षकाने मुलाला शेजारच्या क्लिनिकमध्ये नेले. नंतर त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान शिक्षकाने हा प्रकार मुलाच्या कुटुंबीयांनाही सांगितला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी सांगितले की, "आम्हाला हॉस्पिटलने अलर्ट केले. त्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. मुलाच्या पालकांनी मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असून मृत मुलाच्या वर्गमित्रांची चौकशी करत आहोत."



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif